Bandhkam Kamgar Yojana: महाराष्ट्र राज्याच्या विकासात रस्ते, इमारती, पूल आणि इतर अनेक बांधकाम प्रकल्पांवर बांधकाम कामगारांची भूमिका लक्षात घेऊन राज्य सरकार द्वारे १ मे २०११ रोजी कामगारांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना केली. या मंडळाद्वारे कामगारांना ८४ पेक्षा जास्त योजनांचा थेट लाभ दिला जातो.
राज्यात विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बांधकाम कामगार कार्यरत आहेत, कामगार आपल्या घर, परिवार पासून दूर, ऊन, पाऊस, थंडी मध्ये स्वतःची परवा न करता बांधकामाचं कार्य करत असतात कमी तुटपुंजा पगारात काम करत असल्यामुळे कामगारांना त्यांच्या व परिवारांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक तंगी सारख्या समस्यांचा सामना करावा लागतो.

गरिबी मुळे सेफ्टी किट, सुरक्षेचे साधन, बूट नसल्यामुळं अनेकदा कामगारांना विविध प्रकारच्या अपघातांचा सामना करावा लागतो, ज्यामध्ये त्यांना कायमस्वरूपी अपंगत्व, व काही वेळेला त्यांचा मृत्यू देखील होऊ शकतो अश्या सर्व समस्यांचा विचार करून महाराष्ट्र राज्य शासनाने मे 2011 रोजी कामगारांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली.
राज्यातील पुरुष आणि महिला दोघेही बांधकाम कामगारांमधी समाविष्ट आहेत, त्यांना रोजगारासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करावे लागते ज्यामुळे त्यांना शासनाच्या योजनांपासून सुद्धा वंचित राहावं लागत, याशिवाय त्यांना सामाजिक सुरक्षा आणि इतर फायद्यांपासूनही वंचित ठेवले जाते.
परंतु आता महाराष्ट्र सरकार द्वारे बांधकाम कामगारांच्या हक्कांचे संरक्षण, सुरक्षा, आणि त्यांचे कल्याण वाढवण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलले आहेत, यामध्ये (MBOCW) सारख्या संस्थांची स्थापना समाविष्ट आहे या मंडळामार्फत बांधकाम कामगार क्षेत्रातील कामगारांची नोंद केल्या जाते. नोंदणी झाल्यावर लाभार्थी कामगाराला सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक तसेच आर्थिक सुविधा पुरविल्या जातात व अनेक योजनांचा लाभ दिला जातो ज्याने गरीब बांधकाम कामगार त्याच्या परिवाराच्या गरजेचे वहन करू शकतो.
महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार योजनेची माहिती
योजनेचे नाव | महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना |
---|---|
सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२५ |
लाभार्थी | बांधकाम क्षेत्रातील कामगार |
उद्दिष्ट | कामगारांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
आर्थिक मदत रक्कम | ₹५००० |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ मे २०११ |
बांधकाम कामगार योजनेची अधिकृत वेबसाइट | mahabocw.in |
बांधकाम कामगार योजना एप | Bandhkam Kamgar Yojana App |
Bandhkam Kamgar Yojana
बांधकाम कामगार योजना महाराष्ट्र सरकार द्वारे सुरु केलेली कल्याणकारी योजना आहे, या योजने अंतर्गत नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांना ८४ प्रकारच्या विविध योजनेचा लाभ दिला जातो योजनेसाठी कामगार ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करून योजनेचा लाभ घेऊ शकतो.
योजनेसाठी अर्ज केल्यानंतर लाभार्थ्यांना डीबीटी च्या माध्यमाने 5000 रुपये आर्थिक सहायता राशी बँक खात्यात जमा केली जाते, या शिवाय सेफ्टी किट सुद्धा दिल्या जाते, या किट मधी सेफ्टी शूज, टॉर्च, सेफ्टी हेल्मेट, सेफ्टी जॅकेट, बॅग, टिफिन डब्बा इत्यादी सोबतच कामगारांना पेटी योजने अंतर्गत पेटी, व घरघुती उपयोगात येणाऱ्या भांड्यांचा सेट सुद्धा दिला जातो ज्यामुळे त्यांना स्थलांतर केल्यामुळे नवीन भांडी घ्यावी लागणार नाही.
Bandhkam kamgar yojana अंतर्गत कामगारांच्या पाल्यांना उच्च शिक्षा देण्या साठी व त्यांचे आयुष्य उज्वल करण्यासाठी विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती प्रदान केल्या जाते, सोबतच फ्री लॅपटॉप, फ्री टॅबलेट सुद्धा दिल्या जाते ज्यामुळे त्यांना आधुनिक आणि डिजिटल दुनियेत मिसळण्यात मदद होते. ज्यामुळे पाल्यांच्या शिक्षणाचा खर्च सुद्धा बांधकाम कामगारावरून कमी होतो.
या शिवाय कामगारांना 65 वर्ष वय प्राप्ती केल्यानंतर ₹3000 मासिक पेन्शन, पहिल्या पालाच्या विवाहासाठी अनुदान, मुलींसाठी विविध सुविधा सुद्धा प्रदान केल्या जाते हि योजना बांधकाम कामगारांची आजीविका सुधारणा करून त्यांना आर्थिक दृष्ट्या व सामाजिक दृष्ट्या मजबूत करते.
बांधकाम कामगार योजनेसाठी पात्रता
- अर्जदार बांधकाम क्षेत्रातील कामगार असावा.
- कामगार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- अर्जदार कामगार रस्ते व इमारत बांधकाम मंडळात रजिस्टर असावा.
- योजनेसाठी १८ ते ६० वर्षे वयोगटातील बांधकाम कामगार पात्र असतील.
- अर्जदाराने मागील 12 महिन्यांमध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले केलेले असावे.
- कामगारांकडे आधार कार्डशी लिंक असलेलं बँक खात असले पाहिजे.
बांधकाम कामगार योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
Bandhkam kamgar yojana नोंदणीसाठी खालील कागदपत्रे लागतील
- ९० किंवा त्याहून अधिक दिवस काम केल्याचा दाखला
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- अंगठ्याचा ठसा
- स्व-घोषणा प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- निवास प्रमाणपत्र
- वय प्रमाणपत्र
- बँक खाते पासबुक
- मोबाइल नंबर
बांधकाम कामगार नोंदणी शुल्क
- नोंदणी फी २५/- रुपये (एकदाच) व मासिक वर्गणी १/- रुपये प्रमाणे ५ वर्षाकरिता ६०/- रुपये जमा करणे आवश्यक आहे.
बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म
Maharashtra bandhkam kamgar yojana साठी ऑनलाईन अर्ज सादर करता येतो, त्यासाठी शासनाद्वारे mahabocw पोर्टल तयार केले आहे, यावर आधार कार्ड नंबर व कागपत्र अपलोड करून बांधकाम कामगार निशुल्क अर्ज करू शकतो.
1सगळ्यात आधी बांधकाम कामगार योजनेच्या वेबसाईट वर जा

4त्यानंतर आपल्या समोर नवीन पेज उघडेल, इथे तुम्हाला तुमचा जिल्हा, आधार कार्ड नंबर आणि मोबाइल नंबर प्रविष्ट करायचा आहे.
5सर्व माहिती भरल्यानंतर Proceed to form बटनावर क्लिक करा.

7सर्व माहिती भरल्यानंतर एकदा भरलेली माहिती तपासा व नंतर खाली स्क्रोल करा.

9कागदपत्रे अपलोड केल्यानंतर घोषणा बॉक्स ला टिक करा आणि त्या नंतर सबमिट बटनवर क्लिक करून अर्ज जमा करा
10अर्ज सबमिट केल्यानंतर, तुम्हाला एक नोंदणी क्रमांक मिळेल, तो सुरक्षितपणे ठेवा आणि तुम्ही त्याचा प्रिंटआउट देखील घेऊ शकता.

बांधकाम कामगार योजना फॉर्म
Bandhkam kamgar yojana साठी जर अर्जदार ऑनलाईन माध्यमाचा वापर करून अर्ज सादर करण्यास असमर्थ असेल तर खालील दिलेल्या फॉर्म द्वारे बांधकाम कामगार ऑफलाईन अर्ज सादर करू शकतो, त्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून अर्ज डाउनलोड करा त्या नंतर प्रिंट काढून घ्या.
यानंतर अर्जामधी पूर्ण माहिती भरा आणि कागदपत्रे जोडून जवळच्या (जिल्हाच्या) बांधकाम कामगार विभागात नेऊन जमा करा, त्या नंतर तुम अर्ज पळताळणी केल्या नंतर तुमची केवायसी केल्या जाईल आणि तुम्हाला पावती दिल्या जाईल, या पावतीवर तुमचा नोंदणी क्रमांक सारखी महत्वाची माहिती असेल मानून हि पावती अर्ज स्वीकारल्या जाई पर्यंत सांभाळून ठेवा।
बांधकाम कामगार नोंदणी फॉर्म (संदर्भासाठी) | डाउनलोड करा |
बांधकाम कामगारांचे नूतनीकरण फॉर्म (रिनिवल फॉर्म) | डाउनलोड करा |
९० दिवसांचे काम प्रमाणपत्र – कामगार नोंदणीसाठी ग्रामसेवक (संदर्भासाठी) | डाउनलोड करा |
९० दिवसांचे काम प्रमाणपत्र – कामगार नोंदणीसाठी विकासक (संदर्भासाठी) | डाउनलोड करा |
ऑनलाइन नोंदणीसाठी आधार संमती फॉर्म (संदर्भासाठी) | डाउनलोड करा |
ऑनलाइन नोंदणीसाठी स्वघोषणापत्र (संदर्भासाठी) | डाउनलोड करा |
Bandhkam Kamgar Yojana Online Apply
बांधकाम कामगार योजना फायदे
- आर्थिक सहाय्य: bandhkam kamgar yojana च्या माध्यमाने शासन गरीब बांधकाम मजुरांना ₹5000 पर्यंतचे आर्थिक सहायता प्रदान करते.
- विवाह सहाय्य:बांधकाम कामगार किंवा त्यांच्या पाल्यांच्या विवाहासाठी ₹70000 पर्यंतचे अनुदान व संसारासाठी लागणारी भांडी दिली जाते.
- साधन खरेदी: कामगारांना त्यांच्या व्यवसायासाठी आवश्यक साधने खरेदी करण्यास किंवा सेफ्टी किट, शूज खरेदीसाठी मदत म्हणून एक रक्कम दिली जाते.
- शैक्षणिक समर्थन: कामगारांच्या पाल्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहायता दिली जाते.
- फ्री लॅपटॉप: डिजिटल शिक्षणासाठी मोफत लॅपटॉप पाल्यांना दिला जातो.
- फ्री टॅबलेट: १०वी व १२वी उत्तीर्ण विध्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासेससाठी मोफत टॅबलेट दिला जातो.
- अपंगत्व आणि मृत्यू लाभ: काम करताना कामगाराचा अपघाती अपंगत्व किंवा मृत्यू झाल्यास परिवाराला आर्थिक सहायता दिली जाते.
- विमा: कामगारांना प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजनेचा लाभ दिला जातो.
- वैद्यकीय खर्चाची परतफेड: कामगार अपघातात उपचारादरम्यान खर्च झालेली रक्कमेची वैद्यकीय खर्चाची परतफेड मागू शकतात.
- मातृत्व फायदे: योजनेतून महिला बांधकाम कामगारांना गर्भधारणेदरम्यान आणि बाळंतपणादरम्यान आर्थिक मदत प्रदान केल्या जाते.
बांधकाम कामगार योजनेचे उद्दिष्ट
बांधकाम कामगार योजनेचे उद्दिष्ट खालील प्रमाणे:
- योजने अंतर्गत कामगारांना सुरक्षा तसेच आरोग्य व इतर कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देणे.
- बांधकाम कामगारांना उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देणे.
- आर्थिक सहायता करून परिवारातील गरीब परिस्थिती व आर्थिक तंगी ला कमी करणे.
- कामगारांसाठी रोजगार क्षमता व रोजगाराच्या संधी मध्ये वाढ करणे.
- मजुरांना सामाजिक सुरक्षा उपलब्ध करून देणे.
- कामगार पाल्यांना शिक्षणासाठी प्रेरणा देणे.
- व्यावसायिक आरोग्य आणि कामगारांच्या सुरक्षेसाठी धोरणे / कार्यक्रम / योजना / प्रकल्प घालून आणि कामगारांच्या जीवनशैलीत सुधारणा करणे.
बांधकाम कामगार योजना यादी
- Bandhkam kamgar yojana list चेक करण्यासाठी सगळ्यात आधी mahabocw.in पोर्टल उघडा
- पोर्टल उघडल्यानंतर मेनू मध्ये Benefits Distributed वर क्लिक करा.
- यानंतर Various Scheme Benefits Transferred पर्यावर वर क्लीक करा.
- आता तुमच्या समोर नवीन पेज उघडेल, इथे तुम्हाला जिल्हा, योजनेचा प्रकार, लाभार्थ्यांचे नाव, बँक अकाउंट नंबर व आयएफएससी कोड टाकून Search बटन वर क्लीक करा.
- आता तुमच्या समोर सर्व लाभार्थ्यांची यादी उघडेल इथून तुम्ही आपले नाव तपासू शकता.
बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड डाउनलोड
Bandhkam kamgar yojana अंतर्गत आता लाभार्थ्यांना स्मार्ट कार्ड दिल्या जाते, पण तुम्ही हे स्मार्ट कार्ड डाउनलोड करू शकत नाही. योजनेसाठी अर्ज केल्या नंतर तुम्हाला ते SMS द्वारे कार्यालयातून घेण्यासाठी बोलावले जाते किंवा जवळच्या कामगार सुविधा केंद्राला भेट देऊन हे कार्ड प्राप्त करू शकता.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या पोर्टल वर भविष्यात ऑनलाईन स्मार्ट कार्ड डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध केल्या जाऊ शकते.
Bandhkam Kamgar Yojana FAQ
बांधकाम कामगार नोंदणी कोण करू शकतो?
Bandhkam kamgar yojana साठी महाराष्ट्रातील बांधकाम क्षेत्रातील कोणतेही कामगार अर्ज करू शकतात.
बांधकाम कामगार नोंदणी कुठे करायची?
बांधकाम कामगार योजनेच्या पोर्टल वरून किंवा जवळील रस्ते व इमारत बांधकाम विभाग मधून नोंदणी करू शकतात.
बांधकाम कामगारांना ESI लागू आहे का?
एकाद्या बांधकाम संस्थानामध्ये 10 लाखांपेक्षा अधिक कामगार काम करत असल्यास त्यांना ESI चा लाभ दिल्या जाईल, ESI मध्ये कामगार व त्यांच्या कुटुंबातील सदस्यना संपूर्ण वैद्यकीय देखभाल, आजारपण, तात्पुरत्या स्वरूपाचे किंवा कायमच स्वरूपाचे अपंगत्व, औद्योगिक अपघात किंवा सेवेतील इजेमुळे किंवा व्यावसायिक जोखमीमुळे मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य दिले जाते.
असंघटित कामगार म्हणजे काय?
कुठल्याही संघटनेत काम करत नसेल कामगार म्हणजे असंघटित कामगार होय.
कामगार कल्याण योजना काय आहेत?
कामगार कल्याण द्वारे कामगारांना व त्यांच्या परिवारांना आपत्कालीन मदत, वैद्यकीय सुविधा, शिक्षणासाठी सहायता, आवास योजना, पेंशन सारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाते.