Ladki Bahin Yojana 17th Installment Release: महाराष्ट्रातील महिला लाभार्थ्यांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 17 वा हप्ता (Ladki Bahin Yojana 17th Installment) डिसेंबर महिन्यात अधिकृतरीत्या वितरित केला जाणार आहे. या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या स्थिरता देणे असून, दर महिन्याला पात्र महिलांना ₹1500 DBT माध्यमातून बँक खात्यात जमा होतात.
16 हप्त्यांनंतर आता सर्वांचे लक्ष 17 व्या हप्त्याकडे लागले असून, सरकारने या हप्त्याचे वितरण दोन टप्प्यांमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. या वेळी काही लाभार्थींना 3000 रुपये मिळण्याचीही शक्यता आहे. संपूर्ण माहिती खाली दिली आहे. आणि आज पासून महिलांना दोन टप्प्यात महिलांना 17वा हफ्ता वाटप केल्या जाणार आहे.
Ladki Bahin Yojana 17th Installment Date – 17 वा हप्ता कधी मिळणार?
माझी लाडकी बहीण योजनेचा 17वा हफ्त्याची तारीख समोर आलेली आहे, महाराष्ट्रात सुरु असलेल्या निवडणुकीमुळे महिलांना हफ्ता वाटप करण्यास विलंब झाला, पण काही जिल्ह्यातील निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे, त्यामुळे महिलांना आज पासून नोव्हेंबर महिन्याचा हफ्ता वाटप केल्या जाणार आहे.
माहितीनुसार 17व्या हफ्त्याचा पहिला टप्पा 11 डिसेंबर 2025 पासून सुरु होणार आहे, यामध्ये पडताळणी पूर्ण झालेल्या व ई-KYC अपडेट असलेल्या महिलांना हप्ता प्रथम मिळेल. आणि दुसरा टप्पा 14 डिसेंबर 2025 पासून उर्वरित पात्र महिलांना हप्ता दुसऱ्या टप्प्यात लाभ मिळेल. 2 कोटी 47 लाख महिला या सर्वांना या दोन्ही टप्प्यांमध्ये हप्त्याचा लाभ मिळणार आहे.
- पहिला टप्पा 11 डिसेंबर 2025
- दुसरा टप्पा 14 डिसेंबर 2025
सर्व लाभार्थींना मतदानाच्या आधीच म्हणजे 19 डिसेंबरच्या आधीच नोव्हेंबर महिन्याची किस्त वाटप केल्या जाणार आहे.
Ladki Bahin Yojana 17th Installment Status कसा तपासायचा?
स्टेटस तपासण्यासाठी अधिकृत पोर्टलवर खालील पद्धत वापरावी:
- ladakibahin.maharashtra.gov.in वेबसाइट उघडा
- Applicant Login वर क्लिक करा
- मोबाइल नंबर आणि पासवर्ड टाका
- Application Submitted पर्याय निवडा
- स्टेटस दिसेल
- हप्ता जमा झाला आहे का हे पाहण्यासाठी Actions पर्यायातील रुपये चिन्हावर क्लिक करा
- तिथे पूर्ण पेमेंट माहिती उपलब्ध असते
Beneficiary List (लाभार्थी यादी)
लाभार्थी यादीमध्ये नाव असलेल्या महिलांनाच हप्ता मिळतो. ही यादी खालील मार्गांनी तपासता येते:
- अधिकृत वेबसाइट
- ग्रामपंचायत
- नगरपरिषद / महानगरपालिका
- अंगणवाडी केंद्र
- CSC केंद्र (ग्रामीण भागात)
e-KYC पूर्ण झाल्यानंतरच नाव लाभार्थी यादीत समाविष्ट होते.
पात्रता निकष (Eligibility Criteria)
Ladki Bahin Yojana चा 17 वा हप्ता फक्त खालील अटी पूर्ण करणाऱ्या महिलांनाच मिळेल:
- महिला महाराष्ट्राची कायमस्वरूपी रहिवासी असावी
- वय 21 ते 65 वर्ष
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी
- कुटुंबातील कोणीही सरकारी सेवेत नसावे
- आयकरदाता नसावा
- चारचाकी वाहन नसावे (ट्रॅक्टर वगळलेले)
- बँक खाते आधारशी लिंक असावे
- e-KYC पूर्ण केलेली असावी
या महिलांना 3000 रुपये जमा होणार
यंदाच्या हप्त्यात काही महिलांना एकूण 3000 रुपये मिळत आहेत. कारण खालील बाबी:
- ऑक्टोबरचा 16 वा हप्ता अनेक महिलांना बँक समस्या, आधार लिंक त्रुटी किंवा e-KYC अपूर्ण असल्यामुळे मिळाला नव्हता.
- त्या महिलांना आता 16 वा + 17 वा असे दोन्ही हप्ते एकत्र जमा केले जात आहेत.
यामुळे पात्र महिलांना या महिन्यात 3000 रुपयांची रक्कम मिळत आहे.
नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते एकत्र मिळणार का?
नाही. सध्या वितरित केला जाणारा हप्ता नोव्हेंबर महिन्याचा (17th Installment) आहे.
डिसेंबर हप्ता स्वतंत्रपणे जमा केला जाणार आहे.
निष्कर्ष
Ladki Bahin Yojana चा 17 वा हप्ता 11 आणि 14 डिसेंबरपासून जारी केला गेला आहे. 2 कोटी 47 लाख महिलांना याचा थेट लाभ मिळणार आहे. काही महिलांना मागील हप्ता अडकल्याने यावेळी 3000 रुपये मिळणार आहेत. भविष्यातील हप्ते वेळेवर मिळावेत यासाठी e-KYC पूर्ण असणे आणि बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे.