Ladki Bahin April Installment Date 2026: लाडकी बहीण योजना ₹1500 या दिवशी मिळेल, फायनल तारीख जाहीर

Ladki Bahin April Installment Date 2026: महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी राबविण्यात येणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत एप्रिल 2026 हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती सुनील तटकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एप्रिल महिन्याच्या हप्त्याची माहिती जाहीर केली आहे. या माहितीनुसार राज्यातील सुमारे 2 कोटी 47 लाख महिलांना ₹1500 आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. ही रक्कम DBT प्रणालीद्वारे थेट लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

लाडकी बहीण योजना राज्यातील विवाहित, विधवा, निराधार, परित्यक्ता तसेच कुटुंबातील एक अविवाहित महिलेला दरमहा आर्थिक सहाय्य देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे, कुटुंबातील पोषण स्थिती सुधारणा करणे आणि महिलांना स्वावलंबी बनवणे हा आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत लाभार्थींना 20 हप्त्यांमध्ये ₹30,000 पर्यंत आर्थिक मदत मिळाली आहे.

Ladki Bahin April Installment Date 2026 Overview

घटकमाहिती
योजनेचे नावलाडकी बहीण योजना महाराष्ट्र
सुरूवातमुख्यमंत्री
राज्यमहाराष्ट्र
वर्ष2024
लाभार्थीराज्यातील गरीब महिला
आर्थिक मदत₹1500 प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन व ऑफलाइन
योजना प्रारंभ1 जुलै 2024
eKYC अंतिम तारीख30 एप्रिल 2026
21वा हप्ता24 एप्रिल ते 30 एप्रिल
अधिकृत पोर्टलladkibahin.maharashtra.gov.in

Ladki Bahin April Installment Date 2026

एकनाथ शिंदे यांनी 28 जून 2024 रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेद्वारे पात्र महिलांना दरमहा ₹1500 आर्थिक सहाय्य दिले जाते. एप्रिल 2026 च्या हप्त्यासाठी राज्य सरकारने दोन टप्प्यांमध्ये रक्कम वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

Ladki Bahin April Installment Date 2026 अनुसार एप्रिलचा हफ्ता वाटप 24 एप्रिलपासून वितरण सुरू होणार असून सुमारे 2 कोटी 41 लाख महिलांना 21वा हप्ता दिला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात काही जिल्ह्यांतील महिलांना पैसे मिळतील.

पहिल्या टप्प्यात अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर आणि ठाणे जिल्ह्यांचा समावेश आहे. बाकी उरलेल्या जिल्ह्यातील लाभार्थीना दुसर्या टप्प्यात एप्रिल महिन्याची किस्त देण्यात येईल, किस्तचा लाभ घेण्यासाठी महिलेचं बँक खात आधार कार्डशी लिंक असणे गरजेचं आहे.

लाडकी बहीण योजना पात्रता

या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे:

  • महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी
  • वय 21 ते 65 वर्षे दरम्यान असावे
  • कुटुंब आयकरदाता नसावे
  • बँक खाते आधारशी लिंक असावे
  • DBT सक्रिय असावे
  • कुटुंबात ट्रॅक्टर वगळता दुसरे चारचाकी वाहन नसावे
  • वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा कमी असावे
  • eKYC प्रक्रिया पूर्ण केलेली असावी

एप्रिल हप्त्यात काही महिलांना ₹3000 मिळणार

कधी कधी बँक सर्व्हर किंवा अन्य काही अडचणी मुळे किस्त महिलेच्या बँक खात्यात जमा होत नाही, आणि असेच मागील हफ्त्यासोबत देखील झाले,ज्या महिलांना मागील हप्ता मिळाला नाही त्यांच्यासाठी राज्य सरकारने विशेष निर्णय घेतला आहे. eKYC अपूर्ण किंवा बँक सर्व्हर समस्येमुळे किंवा अन्य कारणांमुळे ज्यांना मागील हप्ता मिळाला नाही अशा महिलांना एप्रिल महिन्यात दोन हप्ते एकत्रित ₹3000 दिले जातील. मात्र पुढील हप्त्यासाठी 30 एप्रिल 2026 पूर्वी eKYC पूर्ण करणे आवश्यक आहे.

Ladki Bahin Yojana eKYC अंतिम तारीख वाढवली

अनेक महिलांना OTP समस्या, कागदपत्रे अपूर्ण किंवा तांत्रिक अडचणीमुळे eKYC करता आली नाही. त्यामुळे महिलांना योजनेपासून वंचित राहू नये म्हणून सरकारने eKYC ची अंतिम तारीख 30 एप्रिल 2026 पर्यंत वाढवली आहे.

Ladki Bahin April Installment Status कसा तपासावा

महिलांनी आपला हप्ता स्टेटस ऑनलाइन खालीलप्रमाणे तपासू शकतात:

  • अधिकृत वेबसाइट उघडा
  • लॉगिन बटनावर क्लिक करा
  • मोबाईल नंबर व पासवर्ड टाका
  • Application Submitted पर्याय निवडा
  • Actions मधील रुपये चिन्हावर क्लिक करा
  • एप्रिल हप्त्याची माहिती तपासा

निष्कर्ष

Ladki Bahin April Installment Date 2026 जाहीर झाल्यामुळे राज्यातील लाखो महिलांना दिलासा मिळाला आहे. एप्रिल महिन्याचा 21वा हप्ता 24 एप्रिलपासून टप्प्याटप्प्याने जमा केला जाणार आहे. ज्यांना मागील हप्ता मिळाला नाही त्यांना ₹3000 मिळण्याची संधी आहे. त्यामुळे पात्र महिलांनी त्वरित eKYC पूर्ण करून या योजनेचा लाभ घ्यावा. ही योजना महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी महत्त्वाची ठरत आहे.

Ladki Bahin April Installment Date 2026 Important Links

लाडकी बहीण योजना वेबसाइटClick here
Helpline Number181
Join WhatsAppJoin Whatsapp
HomepageClick here

Leave a Comment