बांधकाम कामगारांना मिळणार ५००० रूपए | Bandhkam Kamgar 5000

Bandhkam Kamgar 5000: महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाद्वारे बांधकाम कामगारांना हत्यारे/अवजारे खरेदी करण्यासाठी, पाल्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी व दिवाळी सारख्या मुख्य सणासुदीला बोनस म्हणून ५००० रुपयांची आर्थिक सहायता प्रदान केल्या जाते. कामगारांना यासाठी केवळ एक अर्ज करावा लागतो व त्यानंतर ५००० रुपयांची रक्कम थेट बांधकाम कामगाराच्या बँक खात्यात जमा केल्या जाते.

Bandhkam Kamgar 5000

बांधकाम कामगार योजना असंगठित क्षेत्रातील सर्व कामगारांना सुरक्षा, आर्थिक सुरक्षा व आत्मनिर्भर बनवण्यासाठी सुरु करण्यात आलेली कल्याणकारी योजना आहे. या योजने अंतर्गत १८ ते ६० वर्षे वयोगटातील बांधकाम कामगारांना नोंदणी केल्यानंतर ५००० रुपयांची आर्थिक मदद केल्या जाते. याचा लाभ घेण्याकरिता कामगाराला बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये अर्ज करावा लागेल.

Bandhkam kamgar 5000 रुपयेच लाभ कामगारांना प्रत्येकी तीन वर्षानंतर ५००० रुपये दिल्या जाते. याशिवाय त्यांना दिवाळी साजरी करण्यासाठी, पाल्यांच्या शिक्षणासाठी सुद्धा पाच हजार रुपयांची आर्थिक सहायता दिल्या जातो. कामगार ऑफलाईन माध्यमाने अर्ज सादर करू शकतो याची पूर्ण प्रक्रिया या लेखात पाहूया.

Bandhkam Kamgar 5000 योजनेअंतर्गत खालीलप्रमाणे 3 प्रकारच्या योजना राबविल्या जातात.

अ.क्रयोजनाआर्थिक सहाय्य
1.कामगारांना अवजारे खरेदीसाठी ₹5 हजार आर्थिक सहाय्य₹5000/-
2.कामगारांच्या पाल्यांना प्रतिवर्ष ₹5 हजार आर्थिक सहाय्य₹5000/-
3.बांधकाम कामगारांना बोनस सुविधा₹5000/-

बांधकाम कामगार ५००० उद्दिष्ट:

  1. बांधकाम कामगार क्षेत्रातील सर्व कामगारांना बांधकाम क्षेत्रात आवश्यक असणाऱ्या अवजारे खरेदी करण्यासाठी नोंदणीकृत कामगाराला ५००० रुपयांची आर्थिक सहायता प्रदान करणे, ज्याने करून कामगार हत्यारे/अवजारांसाठी लागणाऱ्या खर्चाचे वहन करू शकेल.
  2. दरवर्षी दिवाळीसाठी कामगारांना ५००० रुपयाचाही आर्थिक मदद करणे जेणेकरून गरीब कामगार पत्नी व पाल्यांना नवीन कपडे व फटाके घेऊन उत्सव साजरा करू शकतो.
  3. या योजने चे मुख्य उद्देश्य कामगारांचे जीवनमान सुधारणे आहे.

1. कामगारांना अवजारे खरेदीसाठी ५००० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य

बांधकाम कामगार योजना ५००० रुपये हि कामगारांनासाठी राबविण्यात येणारी उपयुक्त योजना आहे. राज्यातील गरीब कामगारांकडे रस्ते व इमारतच्या बांधकामासाठी लागणारे उपयुक्त अशी अवजारे नसते. गरिबी मूळे नवीन अवजारे खरेदी करणे शक्य नसते यासाठीच कामगारांना अवजारे खरेदीसाठी 5 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिल्या जाते.

योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांना दर तीन वर्षांनी ५०००/- रुपयांची आर्थिक मदत केल्या जाते. मिळालेल्या आर्थिक सहाय्यतेमूळे कामगारांना बांधकाम क्षेत्रात आवश्यक असणारे सर्व अवजारे आणि हत्यारे खरेदी करू शकतात.

2. कामगारांच्या पाल्यांना प्रतिवर्ष ५००० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य

गरीब परिस्थितीमूळे कामगारांच्या पाल्यांना शिक्षण पूर्ण करता येत नाही व ते कमी वयातच शिक्षण सोडून कामाला लागतात यामुळे त्यांचे भविष्य सुद्धा धोक्यात येते. याचा विचार करून इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाद्वारे इयत्ता 8वी ते 10वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या कामगारांच्या पाल्यांना प्रतिवर्ष ५०००/- रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते. ज्याने करून ते गरिबी किंवा आर्थिकतंगीमध्ये सुद्धा आपले शिक्षण पूर्ण करू शकेल.

3. बांधकाम कामगारांना बोनस सुविधा

बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना बोनस सुद्दा दिल्या जाते दिवाळी सारख्या मुख्य साणासूंदीच्या काळात गरीब कामगार आपल्या कुटुंबासाठी नवीन कपडे, पाल्यांसाठी फटाके व इतर लागणाऱ्या वास्तूचे वहन करण्यासाठी बांधकाम कामगारांना प्रतिवर्ष त्यांच्या वेतनानुसार बोनस दिला जातो.

हा बोनस दिवाळीच्या अधिक डीबीटी द्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते परंतु यासाठी कामगारांना अर्ज करावे लागेल पात्रता, अटी, कागदपत्रे, असणाऱ्या सर्व कामगारांना दिवाळी बोनस दिल्या जाईल.

बांधकाम कामगार योजना ५००० रुपयेसाठी पात्रता

  • अर्जदार कामगार इमारत बांधकाम मंडळात रजिस्टर असावा.
  • कामगारांचे वय १८ वर्षा पेक्षा जास्त व ६० वर्षा पेक्षा कमी असावे.
  • अर्जदार कामगाराने मागील तीन वर्षांत किमान 90 दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केले असावे.
  • कामगार महाराष्ट्र राज्याच्या स्थायी रहिवासी असावा.
  • अर्जदाराकडे आधार कार्डशी लिंक बँक खाते असावे.

Bandhkam Kamgar 5000 रुपयेसाठी लागणारी कागदपत्रे

  • नोंदणी प्रमाणपत्र: कामगाराचे मंडळात असलेले नोंदणी प्रमाणपत्र
  • ओळखीचा पुरावा: आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायविंग लायसेन्स
  • रहिवाशी दाखला: डोमेसाइल (आवश्यक असल्यास)
  • पत्ता पुरावा: (वीज बिल, टेलिफोन बिल, आधार कार्ड)
  • 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
  • कायमचा पत्ता पुरावा: रेशन कार्ड, वीज बिल, आधार कार्ड
  • ई-मेल आयडी
  • मोबाईल नंबर (आधार कार्डशी लिंक असावा)
  • पासपोर्ट आकारातील 3 फोटो
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • जन्माचा दाखला: जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला
  • ग्रामपंचायतकडून ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
  • स्व:घोषणापत्र

बांधकाम कामगार ५००० रुपयेसाठी अर्ज कसा करावा

  • बांधकाम कामगार ५००० रुपयांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करता येणार नाही, केवळ ऑफलाईन अर्ज सादर करता येतो.
  • अर्ज करण्यासाठी इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड किंवा खाली दिलेल्या डाउनलोड बटन वर क्लिक करून अर्जाची pdf डाउनलोड करू शकता.
  • अर्ज मिळवल्यानंतर त्यामध्ये आपली माहिती भरा.
  • अर्जामधी माहिती भरल्यानंतर कागदपत्रे जोडा.
  • यानंतर भरलेला अर्ज जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कार्यालयात जमा करा.
  • अर्ज जमा केल्यानंतर ऑनलाईन तुमची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात येईल.
  • सर्व माहिती पोर्टलवर टाकल्यावर ई-केवायसी केल्या जाईल व तुम्हाला पावती दिल्या जाईल.

या पद्धतीने तुम्ही bandhkam kamgar 5000 रुपयेसाठी अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज केल्यावर दिलेल्या बँक खात्यात अनुदान रक्कम जमा केल्या जाईल.

Maharashtra bandhkam kamgar 5000 form:

Bandhkam Kamgar 5000 form

बांधकाम कामगार ५००० रुपयांसाठी पात्र कामगारांची यादी

बांधकाम कामगार ५००० रुपये अनुदान रक्कमेसाठी अर्ज केल्या नंतर तुमचा अर्ज चेक केल्या जाईल व पात्र लाभार्थ्यांची यादी योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जाहीर केल्या जाईल लाभार्थी ऑनलाईन हि यादी चेक करू शकतात.

  • लाभार्थ्यांची यादी चेक करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला ओपन करा.
  • वेबसाईट ओपन केल्यावर मेनू मध्ये Benefits Distributed पर्यायावर क्लीक करा.
  • त्यानंतर Various Scheme Benefits Transferred वर क्लिक करा
  • आता तुमच्यासमोर नवीन पेज उघडेल, इथे तुम्हाला तुमचा जिल्हा, तालुका, लाभार्थ्यांचे नाव, बँक खाते क्रमांक, IFSC कोड अशी माहिती द्यायची आहे.
  • माहिती भरल्यानंतर Search बटनवर क्लिक करा.
  • यानंतर लाभार्थ्यांची यादी उघडेल, तुम्ही या यादीमधी आपले नाव चेक करू शकता.

Bandhkam Kamgar 5000 Form PDF

बांबांधकाम कामगार ५००० फॉर्म pdfडाउनलोड करा
९० दिवसांचे काम प्रमाणपत्र – कामगार नोंदणीसाठी ग्रामसेवक (संदर्भासाठी)डाउनलोड करा
९० दिवसांचे काम प्रमाणपत्र – कामगार नोंदणीसाठी विकासक (संदर्भासाठी)डाउनलोड करा
ऑनलाइन नोंदणीसाठी आधार संमती फॉर्म (संदर्भासाठी)डाउनलोड करा
ऑनलाइन नोंदणीसाठी स्वघोषणापत्र (संदर्भासाठी)डाउनलोड करा

Bandhkam Kamgar 5000 FAQ

बांधकाम कामगार ५००० रुपये कोणाला मिळणार

Bandhkam kamgar 5000 रुपये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी केलेल्या कामगारांना मिळेल.

बांधकाम कामगार योजना ५००० रुपयेसाठी अर्ज कसा करायचा

बांधकाम कामगार योजने अंतर्गत ५००० रुपयांचा लाभ घेण्यासाठी कामगार बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये भेट देऊन ऑफलाईन अर्ज करू शकतात.

bandhakm kamgar 5000 website

https://mahabocw.in/

Leave a Comment