Bandhkam Kamgar Cycle Yojana कामगारांना सायकल वाटप योजना 2025

Bandhkam Kamgar Cycle Yojana: राज्यात इमारत व इतर बांधकामाच्या कामाचे ठिकाण हे शहरामध्ये, शहराच्या बाहय भागात व शहरापासून दूर अंतरावर विखुरलेले असतात. बांधकामाच्या ठिकाणी जाण्याकरीता वाहनांची सुविधा नसते. बांधकाम कामगारांना कामाकरीता त्यांच्या राहत्या ठिकाणापासून दूर दूर पर्यंत पायी जाण्याशिवाय पर्याय राहत नाही.

बांधकाम कामगारांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी वेळेत आणि विना अडथळा पोहचता यावे याकरीता सायकल एक उत्तम माध्यम आहे. त्यामुळे कामगारांना सायकल खरेदीसाठी बांधकाम कामगार सायकल योजना द्वारे ४,५००/- रुपये रक्कम त्यांच्या बँक खात्यात DBT पद्धतीने जमा करण्यात येईल. जेणेकरून कामगार सायकल खरेदी करू शकेल.

Bandhkam Kamgar Cycle Yojana

Bandhkam kamgar yojana मार्फत कामगारांसाठी ३७ पेक्षा जास्त योजना राबवली जाते, ज्यामुळे कामगारांना सामाजिक, आर्थिक मदद केल्या जाते, याच योजनेच्या अंतर्गत आता कामगारांना सायकल वाटप करण्यात येत आहे, काही जिल्ह्यात सायकल दिल्या जात आहे आणि काही जिल्ह्यात सायकल खरेदीसाठी ४५०० रुपये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे जमा केल्या जात आहे.

महाराष्ट्रातील बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना दररोज कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी लांब प्रवास करावा लागतो. अश्यावेळी त्यांच्याकडे स्वतःचे वाहन नसल्यामुळे त्यांना पायदळ जावे लागते किंवा सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे कामगारांचा वेळ, ऊर्जा आणि पैसा दोन्ही खर्च होतो. या सर्व अडचणी लक्षात घेऊन महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने “Bandhkam Kamgar Cycle Yojana” सुरू केली आहे.

बांधकाम कामगार सायकल योजनेचे उद्दिष्ट

  • बांधकाम कामगारांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी वेळेत आणि सहजपणे पोहोचण्यास मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. यामुळे त्यांची कार्यक्षमता आणि उत्पन्न वाढण्यास मदत होईल.
  • कामगारांना कामावर जाण्यासाठी बस ची वाट बघण्याची गरज भासू नये तसेच बस च्या गर्दीचा सामना करावा लागू नये.
  • पात्र बांधकाम कामगारांना सरकारकडून मोफत किंवा अनुदानावर सायकल दिली जाते.
  • सायकलमुळे कामगारांना दररोजचा प्रवास सोपा होतो.
  • वाहतूक खर्च कमी होतो, त्यामुळे आर्थिक बचत होते.
  • सायकल वापरामुळे शारीरिक तंदुरुस्ती सुधरते आणि आरोग्य टिकून राहते.

बांधकाम कामगार सायकल वाटप योजनेचे वैशिष्ट्य

  • योजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाईल.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणतेही शुल्क भरण्याची गरज नाही.
  • कामगार योजनेसाठी मोफत अर्ज सादर करू शकतात.
  • बांधकाम कामगारांना स्वस्त आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणे.
  • कामगारांचा वेळ आणि पैसा वाचवणे.
  • रोजच्या प्रवासामुळे होणारा थकवा कमी करणे आणि कामगारांची उत्पादकता वाढवणे.
  • पर्यावरणपूरक प्रवासाला प्रोत्साहन देणे.

योजनेअंतर्गत कामगारांना मिळणारे आर्थिक सहाय्य

Bandhkam kamgar cycle yojana अंतर्गत कामगारांना सायकल खरेदीसाठी अधिकतम ४,५००/- रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.

बांधकाम कामगार सायकल वाटप योजनेचा कामगारांना होणारा फायदा

  • सायकल चालवल्यामुळे कामगारांच्या शरीराचा व्यायाम होईल व कामगारांचे आरोग्य सुधारेल.
  • कामगारांना बस ची वाट बघण्याची गरज भासणार नाही त्यामुळे त्यांच्या वेळेची बचत होईल.
  • कामगारांना काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.

बांधकाम कामगार सायकल योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

Bandhkam Kamgar Cycle Yojana साठी खालील कागपत्रे बांधकाम कामगारांकडे असणे आवश्यक आहे.

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • रहिवाशी दाखला
  • 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
  • कायमचा पत्ता पुरावा
  • ई-मेल आयडी
  • मोबाईल नंबर
  • काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता
  • नोंदणी अर्ज
  • पासपोर्ट आकारातील 3 फोटो
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • जन्माचा दाखला (शाळा सोडल्याचा दाखला)
  • नियोक्त्याचे मागील वर्षभरात 90 दिवस किंवा दिवसापेक्षा जास्त दिवस काम केल्याच्या दाखला (इंजिनिअर/ठेकेदार)
  • महानगर पालिकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
  • ग्रामपंचायतकडून ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
  • घोषणापत्र

Bandhkam Kamgar Cycle Yojana Online Registration कशे करावे

  • सगळ्यात आधी बांधकाम कामगार मंडळात जाऊन भेट द्या व योजनेची माहिती घ्या.
  • त्यानंतर योजनेचा फॉर्म घेऊन त्यामध्ये आपली माहिती भरा.
  • अर्जामध्ये माहिती भरली कि कागदपत्रे जोडून अर्ज जमा करा.
  • अर्ज जमा केल्यानंतर अर्जाची छाननी होईल व पात्र कामगाराची निवड होईल.
  • त्यानंतर लाभार्थ्यांची यादी जाहीर केल्या जाईल.
  • यादीत नाव समाविष्ट असल्यास कामगाराला अपॉइन्टमेन्टची तारीख घायची आहे.
  • मिळालेल्या अपॉइण्टमेण्टच्या तारखेला कामगाराला सायकल किंवा बँक खात्यात पैसे जमा केल्या जाईल.

बांधकाम कामगार सायकल योजना फॉर्म

खालील दिलेल्या लिंकवरून कामगार अर्जाची पीडीएफ डाउनलोड करून सायकल योजनेसाठी अर्ज सादर करू शकता.

Bandhkam Kamgar Cycle Yojana Form PDFDownload
Bandhkam Kamgar Online RegistrationClick here

महत्वाची सूचना: बांधकाम कामगार सायकल योजनेसाठी अर्ज सुरु झालेले नाही, अर्ज प्रक्रिया सुरु झाल्यावर लाभार्थी कामगार वरील दिलेल्या माहिती नुसार सायकलसाठी अर्ज करू शकतात.

https://bandhkamkamgaryojana.com/peti-yojana

Leave a Comment