Bandhkam Kamgar Yojana Form: बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म 2025

Bandhkam Kamgar Yojana Form: महाराष्ट्र सरकार द्वारे बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी bandhkam kamgar yojana ची सुरुवात केलेली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील कामगारांना ₹५००० आर्थिक सहायता सोबत सेफ्टी किट, आवास योजना, पाल्यांना शिष्यवृत्ती, व ६५ वर्ष वय पूर्ण झाल्यावर ₹३००० मासीक पेन्शन सारख्या ३७ पेक्षा जास्त योजनेचा थेट लाभ दिला जातो.

राज्याच्या विकासात रास्ता व इमारत बांधकाम कामगारांचे मोलाचे महत्व लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकार द्वारे वर्ष २०१४ मधी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची सुरुवात केल्या गेली. या मंडळाद्वारे राज्य सरकारच्या सर्व योजनेचा लाभ कामगारांना दिल्या जातो.

बांधकाम कामगार या योजनेसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन माध्यमाने अर्ज सादर करू शकतात. शासनाद्वारे सुरु केलेल्या mahabocw.in पोर्टल द्वारे बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म करू शकतात. याशिवाय जर अर्जदार ऑनलाईन अर्ज करण्यामध्ये असमर्थ असतील तर जवळील CSC केंद्र, आपले सरकार सेतू सुविधा केंद्रातून करू शकतात.

Bandhkam Kamgar Yojana Form

बांधकाम क्षेत्रात काम करणारे कामगार दिवसरात्र कष्ट करून घाम गाळतात. म्हणून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबाला सामाजिक तसेच आर्थिक सुरक्षा मिळावी यासाठी महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगार योजना (Bandhkam Kamgar Yojana) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना विविध प्रकारचे लाभ मिळतात – जसे की शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, वैद्यकीय मदत, प्रसूती लाभ, अपघात विमा, निवासासाठी आर्थिक सहाय्य, तसेच मुलींच्या लग्नासाठी अनुदान सारख्या ३७ योजनांचा लाभ दिला जातो.

Bandhkam kamgar योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे बांधकाम कामगारांचे आयुष्य सुरक्षित करणे आणि त्यांना मूलभूत सुविधा पुरवणे आहे. मोठ्या शहरांपासून ते लहान गावांपर्यंत बांधकाम मजुरांची संख्या मोठी आहे; पण बहुतांश वेळा ते असंघटित क्षेत्रात काम करत असल्यामुळे त्यांना स्थिर नोकरी, पगार किंवा विमा सुविधा उपलब्ध होत नाहीत. या परिस्थितीत शासनाने राबवलेली ही योजना त्यांच्यासाठी एक मोठा आधार ठरते.

नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांना शासनाने ठरवून दिलेल्या मुदतीत दरवर्षी नोंदणी शुल्क भरावे लागते. त्यानंतर ते विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. उदाहरणार्थ, एखाद्या कामगाराचा अपघात झाल्यास त्याला किंवा त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळते. त्याचप्रमाणे मुलांच्या शिक्षणासाठी फी भरण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते, याशिवाय ६५ वर्ष वय पूर्ण केल्यावर ₹३००० प्रति महिना पेन्शन सुद्धा दिली जाते.

योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी कामगारांना संबंधित जिल्हा कामगार कार्यालयात bandhkam kamgar yojana form द्वारे अर्ज करावा लागतो किंवा अधिकृत वेबसाईटवरून (https://mahabocw.in/) ऑनलाइन नोंदणी करता येते. कागदपत्रे सादर केल्यानंतर पात्रता तपासली जाते आणि त्यानंतर अर्जदाराचा मंजूर होतो व त्यांना योजनेचा लाभ दिल्या जातो.

बांधकाम कामगार योजना पात्रता

  • कामगार महाराष्ट्र राज्याचा स्थायी रहिवासी असावा.
  • योजनेसाठी बांधकाम क्षेत्रातील कामगार अर्ज करू शकतात.
  • कामगारांचे वय कमीत कमी १८ वर्ष व जास्तीत जास्त ६० वर्ष असावे.
  • कामगाराने मागील १२ महिन्यात कमीत कमी ९० दिवस कामगार म्हणून काम केलेले असावे.
  • कामगारांकडे आधार कार्ड सोबत लिंक असलेले बँक खाते असावे.

बांधकाम कामगार योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

Bandhkam kamgar yojana form नोंदणीसाठी खालील कागदपत्रे लागतील

  1. ९० किंवा त्याहून अधिक दिवस काम केल्याचा दाखला
  2. पासपोर्ट आकाराचा फोटो
  3. अंगठ्याचा ठसा
  4. स्व-घोषणा प्रमाणपत्र
  5. आधार कार्ड
  6. निवास प्रमाणपत्र
  7. वय प्रमाणपत्र
  8. बँक खाते पासबुक
  9. मोबाइल नंबर
  10. बांधकाम कामगार योजनेचा फॉर्म

Bandhkam Kamgar Yojana Form PDF

बांधकाम कामगार नोंदणी फॉर्म pdf download

बांधकाम कामगार नोंदणी फॉर्म (संदर्भासाठी)डाउनलोड करा
बांधकाम कामगारांचे नूतनीकरण फॉर्म (रिनिवल फॉर्म)डाउनलोड करा
९० दिवसांचे काम प्रमाणपत्र – कामगार नोंदणीसाठी ग्रामसेवक (संदर्भासाठी)डाउनलोड करा
९० दिवसांचे काम प्रमाणपत्र – कामगार नोंदणीसाठी विकासक (संदर्भासाठी)डाउनलोड करा
ऑनलाइन नोंदणीसाठी आधार संमती फॉर्म (संदर्भासाठी)डाउनलोड करा
ऑनलाइन नोंदणीसाठी स्वघोषणापत्र (संदर्भासाठी)डाउनलोड करा

बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म

Bandhkam kamgar yojana online apply योजनेच्या अधिकृत वेबसाईट द्वारे केला जाऊ शकतो यासाठी केवळ 1 रुपये चलान भरून बांधकाम कामगार नोंदणी करू शकतो. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अर्जदाराकडे सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

  • bandhkam kamgar नोंदणी करण्यासाठी सगळ्यात आधी योजनेची अधिकृत वेबसाईट ओपन करा.
  • https://mahabocw.in/
bandhkam kamgar yojana website
  • mahabocw पोर्टल उघडल्यावर मुख्य पुष्ठावर नोंदणी करण्यासाठी Construction Worker: Registration वर क्लीक करा.
bandhkam kamgar Registration
  • या नंतर तुमच्या समोर नवीन पेज ओपन होईल, इथे तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे.
  • जिल्हा निवडल्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर प्रविष्ट करा आणि मोबाइल नंबर प्रविष्ट करा.
  • माहिती भरल्यानंतर Proceed to Form वर क्लिक करा.
Bandhkam kamgar form
  • आता तुमच्यासमोर bandhkam kamgar form उघडेल.
  • या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची माहिती भरायाची आहे, जसे तुमचं नाव, पत्ता, वडिलांचे नाव किंवा पतीचे नाव, ESIC नंबर, इत्यादी.
bandhkam kamgar online form
  • अर्जामध्ये माहिती भरल्यानंतर कागदपत्रे अपलोड करायचे आहे.
  • कागदपत्रे पोर्टलवर अपलोड केल्यानंतर टिक बॉक्स वर क्लिक करा.
  • आणि त्यानंतर अर्ज सबमिट वर क्लीक करून जमा करून द्या.
bandhkam kamgar application form submit

bandhkam kamgar yojana साठी अर्ज केल्यानंतर तुम्हाला पावतीची डाउनलोड करून प्रिंट काढायाची आहे व, त्याला सर्व कागपत्रे जोडून जिल्ह्याच्या बांधकाम कामगार मंडळाच्या कार्यालयात भेट (appointment) देऊन कागदपत्रांची पडताळणी करायची आहे.

पडताळणी झाल्यावर तुमची केवायसी केल्या जाईल आणि त्यानंतर तुमचा अर्ज कार्यालयात सुद्धा जमा केल्या जाईल, त्याची पावती सुद्धा तुम्हाला मिळेल. या पद्धतीने तुम्ही bandhkam kamgar साठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता.

बांधकाम कामगार नोंदणी शुल्क

  • नोंदणी फी २५/- रुपये (एकदाच)
  • मासिक वर्गणी १/- रुपये.
  • ५ वर्षाकरिता ६०/- रुपये.

बांधकाम कामगार योजना ऑफलाईन फॉर्म

  • जर बांधकाम कामगार ऑनलाईन अर्ज करण्यासाठी असमर्थ असेल तर ऑफलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज सादर करता येतो.
  • ऑफलाईन अर्ज करण्यासाठी सगळ्या आधी bandhkam kamgar yojana form प्राप्त करायचा आहे.
  • अर्जामध्ये मागितलेली सर्व माहिती भरायची आहे व अर्जावर अर्जदाराचा फोटो चिपकावयाचा आहे.
  • त्यानंतर तुम्हाला अर्जासोबत कागदपत्र जोडायची आहे.
  • आता तुम्हाला अर्ज जवळच्या बांधकाम कामगार मंडळाच्या कार्यालयात जमा करायचा आहे.
  • अर्ज जमा केल्यावर तुम्हाला पावती दिल्या जाईल.
  • अशा पद्धतीने तुम्ही बांधकाम कामगार योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करू शकता.

बांधकाम कामगार यादी

बांधकाम कामगार योजनेसाठी अर्ज केल्यावर लाभार्थी कामगारांची यादी पोर्टलवर जाहीर केल्या जाते. हि यादी कामगार मोबाइलला द्वारे ऑनलाईन चेक करू शकतो.

Bandhkam Kamgar List:

  • लाभार्थ्यांची यादी चेक करण्यासाठी योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जा.
  • पोर्टलवर गेल्यानंतर मेनू मध्ये Benefits Distributed वर क्लिक करा.
  • त्यानंतर ड्रॉप डाऊन मेनू मध्ये Various Scheme Benefits Transferred पर्यायावर क्लीक करा.
  • आता तुम्हाला तुमचा जिल्हा, योजनेचा प्रकार, लाभार्थ्यांचे नाव, बँक खाते क्रमांक, व IFSC कोड वगैरे प्रविष्ट करायचा आहे.
  • त्यानंतर तुम्हाला Search बटन वर क्लीक करायचे आहे.
  • आता तुमच्या समोर लाभार्थ्यांची यादी उघडून जाईल.
  • या यादी मध्ये तुम्ही तुमचे नाव चेक करू शकता.
Bandhkam Kamgar List

Maharashtra Bandhkam Kamgar Yojana Form FAQ

Mahabocw Status Check

बांधकाम कामगाराने योजनेसाठी अर्ज केल्यानंतर अर्जदार योजनेच्या वेबसाईट वरून अर्जाची स्थिती करू शकतात. स्टेटस चेक करण्यासाठी पोर्टल मध्ये लॉगिन केल्यानंतर application status वर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती चेक करू शकता.

Www MAHABOCW in Renewal online Login

पोर्टल मध्ये लॉगिन करण्यासाठी Construction Worker:Profile Login वर क्लिक करा. या नंतर आधार कार्ड नंबर आणि मोबाइल नंबर प्रविष्ट करून Proceed to form वर क्लिक करा. या नंतर तुम्हाला ओटीपी येईल, तो ओटीपी वेबसाईट मध्ये प्रविष्ट करून वेरिफाय केल्यानंतर तुम्ही वेबसाईट मधी लॉगिन होऊन जाणार.

Leave a Comment