Bandhkam Kamgar Peti Yojana: महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाद्वारे कामगारणासाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात, कामगारांना सुरक्षा व सहायता देण्यासाठी शासनाद्वारे बांधकाम कामगार पेटी योजना सुरु करण्यात आली आहे, या अंतर्गत कामगाराला सेफ्टी किट देऊन सुरक्षेची ग्यारंटी दिली जाते.
रस्ते, इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणारे कामगार दररोज विविधप्रकारच्या जोखमी आणि अपघातांचा सामना करतात. हे कामगार बहुतांशी गरीब वर्गातील असल्याने त्यांच्याकडे सुरक्षेसाठी आवश्यक अशी सेफ्टी किट उपलब्ध नसते. कमी पगार व गरिबीमुळे ते स्वतःहून ही सुरक्षेची साधने विकत घेऊ शकत नाहीत, त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारच्या सुरक्षाविना काम करावे लागते. अशा परिस्थितीत अपघात झाल्यास कामगारांना गंभीर दुखापत, अपंगत्व किंवा अनेक वेळा त्यांना आपला जीव गमवावा लागतो.
या समस्येची जाणीव ठेवून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे Bandhkam Kamgar Peti Yojana सुरू करण्यात आलेली आहे, या योजनेअंतर्गत बांधकाम क्षेत्रातील सर्व नोंद असलेल्या कामगारांना मोफत सेफ्टी किट उपलब्ध करून देण्यात येते, ज्यामुळे त्यांच्या सुरक्षेची हमी मिळेल आणि अपघातांची शक्यता कमी होईल.
बांधकाम कामगार पेटी योजनेची माहिती
| योजनेचा नाव | Bandhkam Kamgar Yojana |
| लाभार्थी | बांधकाम कामगार योजनेतील कामगार |
| योजनेची सुरुवात | १ मे २०११ |
| राज्य | महाराष्ट्र |
| लाभ | कामगारांना सेफ्टी किट मिळेल |
| उद्देश्य | कामगारांना सुरक्षा प्रदान करणे |
| पेमेंट मोड | ऑनलाइन (DBT) |
| आधिकारिक वेबसाइट | mahabocw.in |
Bandhkam Kamgar Peti Yojana
महाराष्ट्र सरकारकडून बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेल्या कामगारांच्या सुरक्षेसाठी एक महत्त्वाची योजना राबविण्यात आली आहे या योजनेचं नाव “Bandhkam Kamgar Peti Yojana” असून या योजनेचा मुख्य उद्देश कामगारांना आवश्यक सुरक्षासाहित्य उपलब्ध करून बांधकाम स्थळी होणाऱ्या दुर्घटनेत त्यांच्या जीविताचे संरक्षण करणे आहे.
योजनेअंतर्गत मिळणाऱ्या या सेफ्टी किटमुळे कामगारांना कामाच्या ठिकाणी स्वतःचे संरक्षण करता येते आणि होणाऱ्या अपघातापासून सुद्धा बचाव होतो. यामुळे फक्त कामगारांची सुरक्षितता नव्हे, तर त्यांच्या कुटुंबाच्या आयुष्याचाही बचाव होण्यास मदद मिळते.
आर्थिक तंगीमुळे कामगारांना सेफ्टी किट विकत घेऊ शकत नाही. म्हणून पेटी योजने मार्फत महाराष्ट्रातील सर्व बांधकाम कामगार मंडळात नोंदणीकृत असलेल्या पात्र कामगाराला ही पेटी मोफत दिल्या जाते.
बांधकाम कामगार पेटी योजनेचे उद्दिष्ट
बांधकाम क्षेत्र हे अपघात आणि जोखमीचे क्षेत्र आहे. रोजच्या कामात उंचावर चढणे, जड साहित्य उचलणे, यंत्रसामग्री वापरणे त्यामुळे कामगारांच्या सुरक्षेवर सतत धोका निर्माण होत असतो. याच पार्श्वभूमीवर bandhkam kamgar yojana द्वारे सेफ्टी किट दिल्या जाते.
पेटी योजनेचे उद्दिष्ट म्हणजे राज्यातील बांधकाम कामगारांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे आणि त्यांना आवश्यक सुरक्षासाहित्य मोफत उपलब्ध करून देणे.
Bandhkam kamgar essential kit उद्देश पुढीलप्रमाणे आहे
- बांधकाम कामगारांना मोफत सेफ्टी किट देऊन त्यांची कार्यक्षमता व आत्मविश्वास वाढवणे.
- अपघातांचे प्रमाण कमी करून कामगारांचे जीवित रक्षण करणे.
- बांधकाम क्षेत्रात सुरक्षित वातावरण निर्माण करणे.
- कामगार आणि त्यांच्या कुटुंबांचे आर्थिक व सामाजिक संरक्षण करणे.
बांधकाम कामगार पेटी योजना अंतर्गत कामगारांना दिल्या जाणाऱ्या वस्तू
Bandhkam kamgar essential kit मध्ये मिळणारी साहित्य खालीलप्रमाणे:
- बॅग
- रिफ्लेक्टर जॅकेट
- सेफ्टी हेल्मेट
- चार कप्प्याच्या जेवणाचा डबा
- सेफ्टी बूट
- सोलर टॉर्च
- सोलर चार्जर
- पाण्याची बॉटल
- मच्छरदाणी जाळी
- सेफ्टी बूट
- हात मोजे
- चटई
- पेटी
बांधकाम कामगार पेटी योजनेसाठी पात्रता
- योजनेसाठी कामगार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
- बांधकाम कामगाराचे वय कमीत कमी १८ वर्षे आणि जास्तीत जास्त ६० वर्षे असावे.
- कामगाराने मागील वर्षांमध्ये ९० दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असावे.
- लाभार्थी कामगाराचे नाव महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंद असावी.
- योजनेसाठी कामगाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयेपेक्षा कमी असावे.
- कामगाराचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असावे.
- पेटी योजनेचा लाभ एका कामगाराला एकदाच दिल्या जाईल.
बांधकाम कामगार पेटी योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
Bandhkam kamgar peti yojana साठी खालील कागदपत्रे लागतील:
- आधार कार्ड
- रहिवाशी दाखला
- मोबाईल नंबर
- इमेल आयडी
- 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- शपथ पत्र
- वयाचा दाखला
- बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी प्रमाणपत्र
Bandhkam Kamgar Peti Yojana Online Registration कैसे करायचे
- बांधकाम कामगार पेटी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सगळ्यातआधी जवळील बांधकाम कामगार योजनेच्या कार्यालयात भेट द्या.
- कार्यालयात गेल्यानंतर bandhkam kamgar peti yojana form प्राप्त करा.
- त्यांनतर अर्जामध्ये मागितलेली पूर्ण माहिती प्रविष्टय करा.
- अर्जामध्ये माहिती भरल्यानंतर कागदपत्रे जोडून अर्ज जमा करा.
- त्यानंतर अर्जाची पावती प्राप्त करा.
- या पद्धतीने कामगार योजनेसाठी अर्ज सादर करू शकते.
Bandhkam Kamgar Peti Yojana Form
खालील दिलेल्या लिंकवरून कामगार अर्जाची पीडीएफ डाउनलोड करून Bandhkam kamgar essential kit म्हणजेच पेटी योजनेसाठी अर्ज सादर करू शकता.
| Bandhkam Kamgar Peti Yojana Form PDF | Download |
| Bandhkam Kamgar Online Registration | Click here |