बांधकाम कामगार अटल पेंशन योजना 2025 | Bandhkam Kamgar Pension Yojana

Bandhkam Kamgar Pension Yojana: महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाद्वारे कामगारांसाठी पेंशन योजनेची सुरुवात केलेली आहे. जो पर्यंत कामगारांचे हाथ पाय सुरु असतात तो पर्यंत त्याला आर्थिक उत्पन्न मिळत असते. परंतु वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यावर त्याच्याजवळ उत्पन्नाचे कुठल्याच प्रकारचे साधन नसते. आणि म्हातारपणा मुळे तो कामही करू शकत नाही व अशा वेळी कामगाराला आजारी पडल्यास औषोधोपचारासाठी किंवा अन्य बाबींसाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.

त्याचसोबत कामगाराला परिवाराच्या गरजा पूर्ण करणे सुद्धा कठीण होऊन जाते. कामगारांना त्यांच्या वृधोपकाळात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठीच महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मार्फत अटल पेंशन योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेच्या माध्यमातून कामगार प्रत्येक महिन्याला पेंशन दिल्या जाईल जेणेकरून वृद्ध कामगार आपल्या दैनिक गरजा पूर्ण करू शकेल.

Bandhkam Kamgar Pension Yojana

बांधकाम कामगार अटल पेंशन योजना पूर्णपणे महाराष्ट्र राज्यात लागू करण्यात अली आहे. यासाठी नोंद असलेल्या कामगारांना अर्ज सादर करून काही रक्कम प्रति महिना निवेश करावी लागेल, २५० रुपये प्रति माह जमा केल्यास कामगारांना ५००० रुपये प्रति महिना पेंशन दिल्या जाईल.

या योजनेसाठी १८ वर्षावरील सर्व बांधकाम क्षेत्रातील कामगार अर्ज करू शकतात. लाभार्थ्यांना ६० वर्ष प्राप्त केल्यावर त्यांच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे प्रति महिना ३००० रुपये ते ५००० रुपये पर्यंतची मासिक पेंशन दिल्या जाईल. यामुळे वृद्ध कामगार अल्पबचत करुन उतार वयात महिन्याचा औषधांचा खर्च भागविता येतो.

बांधकाम कामगार पेंशन योजनेसाठी निवेश राशी खालीलप्रमाणे

बांधकाम कामगार अटल पेंशन योजनेअंतर्गत कामगारांना पेंशन प्राप्त करण्यासाठी खालीलप्रमाणे पैसे निवेश करावे लागतील, कामगारांना हे पैसे प्रति महिन्याला जमा करावे लागेल.

वयोमर्यादाभरावयाची रक्कम
वयाच्या 18 व्या वर्षी210/- रुपये
वयाच्या 25 व्या वर्षी376/- रुपये
वयाच्या 30 व्या वर्षी577/- रुपये
वयाच्या 35 व्या वर्षी902/- रुपये
वयाच्या 39 व्या वर्षी1318/- रुपये

Bandhkam Kamgar Pension Yojana चे उद्दिष्ट

  • आर्थिक सुरक्षितता: वयोवृद्ध कामगारांना दरमहा ५००० रुपये पेंशन देऊन त्यांचा दैनंदिन खर्च भागवता येतील.
  • जीवनमान सुधारणा: कामगाराला त्यांच्या छोट्यामोठ्या गरजांसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागत नाही, त्याने वृद्धावस्थेतही कामगाराला सन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध होते.

बांधकाम कामगार पेंशन योजनेचे उद्देश्य

Bandhkam kamgar atal pension yojana कामगारांना आर्थिक सुरक्षितता आणि सामाजिक संरक्षण मिळावे या उद्देश्याने राबवली जात आहे, जेणेकरून कामगारांना दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागत नाही, पेंशन मधून ते त्यांच्या गरजा पूर्ण करू शकते. हि योजना बांधकाम क्षेत्रातील कामगारांना आर्थिक स्थैर्य देऊन सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करते व जीवनमानमध्ये सुधारणा करते.

बांधकाम कामगार पेंशन योजनेसाठी पात्रता

  • अर्जदार बांधकाम क्षेत्रातील कामगार असावा.
  • कामगारांचे वय १८ वर्ष पेक्षा जास्त असावे.
  • अर्जदार कामगार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये रजिस्टर असावा.
  • कामगारांकडे आधार कार्ड सोबत लिंक असलेले बँक खाते असावे.

बांधकाम कामगार पेंशन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

Bandhkam kamgar pension yojana साठी कामगारांकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • रहिवाशी दाखला
  • 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
  • कायमचा पत्ता पुरावा
  • ई-मेल आयडी
  • मोबाईल नंबर
  • काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता
  • नोंदणी अर्ज
  • पासपोर्ट आकारातील 3 फोटो
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • जन्माचा दाखला (शाळा सोडल्याचा दाखला)
  • नियोक्त्याचे मागील वर्षभरात 90 दिवस किंवा दिवसापेक्षा जास्त दिवस काम केल्याच्या दाखला (इंजिनिअर/ठेकेदार)
  • महानगर पालिकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
  • ग्रामपंचायतकडून ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
  • घोषणापत्र

Bandhkam Kamgar Pension Yojana Online Registration

बांधकाम कामगार पेंशन योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत

बांधकाम कामगार अटल पेंशन योजनेसाठी कामगार ऑनलाईन अर्ज सादर करू शकत नाही, इच्छुक कामगाराला जवळील बांधकाम कामगार मंडळाच्या कार्यालयात जाऊन अर्ज सादर करावा लागेल.

  • कामगाराला आम्ही खाली दिलेल्या लिंक वरून योजनेचा अर्ज डाउनलोड करावा लागेल.
  • अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करावा लागेल.
  • अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

Bandhkam Kamgar Pension Yojana Form

कामगारांनी खालील लिंकवरून अर्ज डाउनलोड केल्यावर त्याची प्रिंटाऊट काढावी लागेल, व त्यानंतर त्यामद्ये माहिती भरून कागदपत्रे जोडायची आहे व अर्ज कार्यालयात जमा करायचा आहे.

योजनांचे अर्जइथून डाउनलोड करा
बांधकाम कामगार अटल पेंशन योजना चा अर्ज 1डाउनलोड
Bandhkam Kamgar Pension Yojana चा अर्ज 2डाउनलोड
बांधकाम कामगार अधिकृत पोर्टलयेथे क्लिक करा

Leave a Comment