Bandhkam Kamgar Awas Yojana: महाराष्ट्र ईमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाद्वारे राज्यातील निराश्रित गरीब कामगारांसाठी अटल बांधकाम कामगार आवास योजना सुरु करण्यात आलेली आहे, या योजने अंतर्गत नोंद असलेल्या कामगारांना पक्के मकान उपलब्ध करून दिल्या जाईल, सोबतच ग्रामीण व शहरी भागात कामगारांच्या स्वतः च्या जागेवर नवीन घर बांधण्यासाठी आर्थिक मदद केली जाईल.
राज्याच्या विकासात महत्वाची भूमिका बाजवणाऱ्या कामगारांचे घर मात्र गरिबीमुळे कच्चे असते, आर्थिक दुर्ष्ट्या दुर्बल असल्यामुळे पक्के मकान बनविणे शक्य नाही, अशा कामगारांना मात्र आता शासनाद्वारे कच्च्या घराचे पक्क्या घरात रूपाांतर करण्यासाठी ग्रामीण व शहरी भागात वेगवेगळी आर्थिक मदद दिल्या जात आहे.
Atal bandhkam kamgar yojana साठी महाराष्ट्रातील कामगार अर्ज करू शकतात, योजनेची पात्रता पूर्ण केल्यास त्यांना आवाससाठी निधी दिला जाईल, योजने अंतर्गत मिळणारी आर्थिक मदद थेट DBT द्वारे लाभार्थी कामगाराच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते, यामुळे भ्रष्टाचार कमी होऊन पूर्ण लाभ गरीब निर्माण कामगाराला मिळते.
पक्के घर सोबतच कामगाराला सौचालाय सुद्धा दिला जातो, स्वच्छ भारत मिशन योजनेअंतर्गत 12000 हजार रुपये सौचालाय बांधण्यासाठी दिले जाते. याशिवाय स्वच्छ पिण्याचे पाणी, वीज सुविधा, भांडी योजनेमधून घरघुती वापरण्यात येणारी भांडी सुद्दा कामगाराला व परिवाराला दिल्या जाते. जर तुम्ही इमारत व इतर बांधकाम कामगार असाल व या योजनेसाठी अर्ज करू इच्छित तर हा लेख पूर्ण वाचा यात अटल बांधकाम कामगार योजनेची पूर्ण माहिती दिलेली आहे.
बांधकाम कामगार आवास योजनेची माहिती
| योजनेचे नाव | महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना |
|---|---|
| कोणी सुरु सुरू केले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२५ |
| लाभार्थी | बांधकाम क्षेत्रातील कामगार |
| लाभ | पक्के घर बांधण्यासाठी आर्थिक मदद |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ मे २०११ |
| बांधकाम कामगार योजनेची अधिकृत वेबसाइट | mahabocw.in |
| बांधकाम कामगार योजना एप | Bandhkam Kamgar Yojana App |
Bandhkam Kamgar Awas Yojana
महाराष्ट्र सरकारद्वारे राज्यातील असंगठित क्षेत्रातील व निर्माण इमारत बांधकाम क्षेत्रातील सर्व कामगारांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बाांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची निर्मिती केली आहे, या मंडळाद्वारे bandhkam kamgar yojana मध्ये नोंद केलेल्या सर्व कामगारांना 37 पेक्षा जास्त योजनेचा थेट लाभ दिला जातो.
या मंडळाद्वारे ३ फेब्रुवारी २०१८ पासून महाराष्ट्र राज्यात bandhkam kamgar awas yojana राबवली जात आहे, या योजनेअंतर्गत ग्रामीण क्षेत्रातील लाभार्थ्यांना स्वत:च्या /पती /पत्नीच्या नावावरील जागेवर नवीन घर बाांधण्यासाठी अर्वा अस्स्तत्वात असलेल्या कच्च्या घराचे पक्क्या घरात रूपांतर करण्यासाठी 1.50 लक्ष अनुदान दिल्या जाते.
व शहरी भागात घर बांधकामासाठी 2 लक्ष अनुदान दिल्या, परंतु यासाठी कामगाराला अर्ज सादर करावा लागतो व अर्ज मंजूर झाल्यास लाभार्थीला पक्के आवास व सौचालायचा लाभ दिला जातो, ज्या शहरी विभागात MHADA फ्लॅट्स उपलब्ध असतात तिथल्या कामगारांना MHADA मध्येच फ्लॅट सुद्धा या योजनेच्या माध्यमातून दिल्या जाते.
Atal Bandhkam Kamgar Awas Yojana Gramin
Bandhkam kamgar awas yojana हि शहरी व ग्रामीण विभागासाठी वेगळी वेगळी राबवली जाते, सोबतच विभागानुसार लाभार्त्यांना आर्थिक मदद मिळते, मुख्यतः ग्रामीण क्षेत्रातील गरीब कामगारांना पक्के घर मिळावे या अनुसंगाने अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण हि राबवली जाते.
ज्यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर ( MGNREGA) अनुज्ञेय असणारे १८००० रुपये तसेच स्वच्छ भारत अवभयानद्वारे शौचालय बाांधण्यासाठी अनुज्ञेय असलेले रू.12,000/- असे एकूण ३०००० रुपये एकूण अनुदान 1.50 लक्ष रुपये लाभार्थ्याला टप्प्या टप्प्यात दिले जाते. देण्यात येणारी रक्कम थेट लाभार्थी कामगाराच्या बँक खात्यात जमा केली जाते.
घराचे क्षेत्रफळ
अटल बांधकाम कामगार आवास योजना ( ग्रामीण ) अंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व बांधकाम कामगारांकडे किमान २६९ चौ. फुट इतके चटई क्षेत्र असलेले घर बांधकाम करणे आवश्यक आहे. त्याकरिता १.५० लक्ष एवढे अनुदान देय राहील. मात्र, लाभार्थ्यास त्यापेक्षा जास्त क्षेत्राचे बाांधकाम स्वखर्चाने करण्यास मुभा राहील.
अटल बांधकाम कामगार आवास योजनेसाठी पात्रता
Atal bandhakam kamgar yojana साठी केवळ महाराष्ट्रातील कामगार अर्ज सादर करू शकतात, अर्ज सादर करण्यासाठी लाभार्थ्यांना खालील पात्रता पूर्ण करावी लागेल, पात्रता पूर्ण केल्यास कामगाराला पक्के घर बांधण्यासाठी योजनेचा लाभ दिल्या जाईल.
- लाभार्थी कामगार महाराष्ट्र राज्याचा स्थायी निवासी असावा.
- अर्जदार कामगाराची महाराष्ट्र इमारत व कल्याणकारी मंडळामध्ये नोंद असावी.
- कामगाराची नोंद १ वर्ष किंवा यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे.
- कामगाराने 365 दिवसांपैकी किमान 90 दिवस तरी बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असावे.
- कामगाराकडे पक्के मकान नसावे.
- अर्जदाराकडे बँक खाते असावे व खात्याचे DBT (Direct Benefit Transfer) सक्रिय असावे.
अटल बांधकाम कामगार आवास योजनेसाठी कोणते कागदपत्रे लागतील
Bandhkam kamgar yojana साठी खालील कागदपत्रे लागतील.
- प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र असल्याबाबत सक्षम अधिकाऱ्याचे पत्र/प्रमाणित यादी
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- रहिवाशी दाखला
- 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
- कायमचा पत्ता पुरावा
- ई-मेल आयडी
- मोबाईल नंबर
- काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता
- नोंदणी अर्ज
- पासपोर्ट आकारातील 3 फोटो
- बँक पासबुक झेरॉक्स
- जन्माचा दाखला (शाळा सोडल्याचा दाखला)
- नियोक्त्याचे मागील वर्षभरात 90 दिवस किंवा दिवसापेक्षा जास्त दिवस काम केल्याच्या दाखला (इंजिनिअर/ठेकेदार)
- महानगर पालिकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
- ग्रामपंचायतकडून ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
- घोषणापत्र
Bandhkam Kamgar Awas Yojana Apply Online
Bandhkam kamgar awas yojana साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु झालेली नाही, अर्जदार कामगाराला ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागेल, त्यासाठी लागणार अर्ज खाली दिला आहे तिथून डाउनलोड करून अर्जदार योजनेसाठी अर्ज सादर करू शकतो.
- अटल आवास योजनेसाठी अर्ज करण्याकरिता सगळ्यात आधी ग्रामपंचायत/कामगार कार्यालय मधून योजनेचा अर्ज प्राप्त करायचा आहे.
- त्यानंतर अर्जामध्ये मागितलेली पूर्ण माहिती भरायची आहे.
- माहिती भरल्यानंतर योजनेसाठी लागणारी सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडावे.
- यानंतर हा अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करावा लागेल.
- कामगार कार्यालयमध्ये कामगाराचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने केला जाईल.
- कर्मचाऱ्याद्वारे ऑनलाईन माहिती पोर्टलवर टाकल्यानंतर त्याची पावती कामगाराला दिल्या जाईल.
- या पद्धतीने कामगार बांधकाम कामगार योजनेसाठी अर्ज सादर करू शकतात.
Bandhkam Kamgar Awas Yojana List
अटल बांधकाम कामगार आवास योजनेच्या शासन निर्णयानुसार उप जिल्हा कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ तथा सदस्य सचिव सनियंत्रण समिती हे सनियंत्रण समितीच्या छाननीत पात्र झालेल्या आणि मंजुरी दिलेल्या बांधकाम कामगारांची तालुका निहाय यादी तयार करतील.
सदर यादी सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांना सादर करतील आणि त्याची प्रत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद तथा अध्यक्ष, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांना उपलब्ध करुन देतील.
बांधकाम कामगार आवास योजनेची यादी लाभार्थी ग्रामपंचायत किंवा आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात भेट देऊन तपासू शकतात.
अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा लाभ
Atal bandhkam kamgar awas yojana द्वारे गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल बांधकाम कामगारांचे पक्क्या घराचे स्वप्न पूर्ण केले जाते, या योजनेच्या माध्यमातुन कामगाराला स्वतःच्या जमिनीवर पक्के मकान उभारण्यास आर्थिक सहायता दिली जाते, याशिवाय सौचालाय, वीज सुविधा, व स्वच्छ पाण्याचे नळ सुविधा सुद्धा दिली जाते.
अटल आवास योजना फॉर्म PDF डाउनलोड:
| अटल आवास योजना फॉर्म शहरी | Download |
| अटल आवास योजना फॉर्म ग्रामीण | Download |
| Atal bandhkam kamgar awas yojana (gramin) शासन निर्णय | Download |
| Atal bandhkam kamgar awas yojana (Shahari) शासन निर्णय | Download |
| अधिकृत वेबसाइट | mahabocw.in |