Bandhkam kamgar bhandi yojana: बांधकाम कामगार योजनेअंतर्गत आता नोंदणी केलेल्या सर्व कामगारांना भांडी संच देण्यात येत आहे ज्यामध्ये 17 प्रकारची 30 वेगवेगळी भांडी मिळत आहे, यासाठी केवळ कामगारांना ऑनलाईन माध्यमातून अर्ज सादर करायचा आहे, आणि हा अर्ज निशुल्क असणार आहे.
रस्ते व इमारत बांधकाम कामगारांना रोजगारासाठी नेहमी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करावा लागतो, प्रत्येकी वेळी नवीन भांडी घेऊ शकत नाही आणि काही गरिबांच्या परिवारात साधी स्वयंपाकाची भांडी पण नसते, याकडेच लक्ष देऊन महाराष्ट्र शासनाद्वारे bandhkam kamgar संकल्पनेतून आता २० हजार रुपये किमतीचे भांडी संच प्रत्येकी कामगाराला देण्यात येत आहे.
बांधकाम कामगार भांडी योजनेची माहिती
योजनेचे नाव | महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना |
---|---|
सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२५ |
लाभार्थी | बांधकाम क्षेत्रातील कामगार |
लाभ | बांधकाम कामगारांना २० हजार रुपये किमतीचा भांडी संच मिळतो |
आर्थिक मदत रक्कम | ₹५००० |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ मे २०११ |
बांधकाम कामगार योजनेची अधिकृत वेबसाइट | mahabocw.in |
बांधकाम कामगार योजना एप | Bandhkam Kamgar Yojana App |
Bandhkam Kamgar Bhandi Yojana
महाराष्ट्र शासनाद्वारे १७ ऑक्टोबर २०२० रोजी bandhkam kamgar bhandi yojana ची सुरुवात केली, या योजनेचा उद्देश्य राज्यातील गरीब कामगारांच्या परिवारात गृहउपयोगी भांडीचा खर्च कमी करून, त्यांचे जीवनमान सुधारणे आहे, पहिल्या टप्प्यात ज्या कामगारांना भांडी संच मिळाला नाही फक्त त्यांनाच आता दुसऱ्या टप्प्यात भांडी मिळणार आहे.
भांडी योजनेमध्ये कामगाराला ४ ताट, ८ वाट्या, ४ पाण्याचे ग्लास, ३ वेगवेगळ्या आकाराचे पातेले झाकणास, १ मोठा चम्मच (भात वाढणी), १ मोठा चम्मच (वरण वाढणी), १ पाण्याचा जग, १ मसाला डब्बा (सात भाग असलेला), ३ वेगवेगळ्या आकाराचे डब्बे झाकणास, १ परात, १ प्रेशर कुकर (स्टेनलेस स्टीलचा), १ कढई, १ मोठी स्टीलची टाकी झाकणासह व वगराळासह इत्यादी ३० भांडी देण्यात येते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व कामगारांना अर्ज सादर करणे गरजेचे आहे, कामगार ऑनलाईन किंवा महाराष्ट्र इमारत आणि बांधकाम कामगार कल्याण मंडळामध्ये भेट देऊन ऑफलाईन अर्ज सादर करू शकतो, अर्ज सादर केल्यानंतर भेटीची तारीख मिळते त्या दिवशी लाभार्थ्याला भांडी संचचा वाटप केला जातो.
बांधकाम कामगार भांडी योजनेसाठी पात्रता
- अर्जदार कामगार बांधकाम कामगार कल्याण मंडळामध्ये नोंदणी केलेला असावा.
- कामगार महाराष्ट्र राज्याच्या स्थायी निवासी असावा.
- अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे.
- कामगाराने योजने अंतर्गत भांडी संच प्राप्त केलेला नसावा.
- बांधकाम कामगाराने मागील वर्षात 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस कामगार म्हणून काम केलेले असावे.
- कामगाराच्या परिवाराचे आर्थिक उत्त्पन्न 1 लाखापेक्षा जास्त नसावे.
बांधकाम कामगार भांडी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
Bandhkam kamgar bhandi yojana 2025 नोंदणीसाठी खालील कागदपत्रे लागतील
- ९० किंवा त्याहून अधिक दिवस काम केल्याचा दाखला
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- अंगठ्याचा ठसा
- स्व-घोषणा प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- निवास प्रमाणपत्र
- वय प्रमाणपत्र
- बँक खाते पासबुक
- मोबाइल नंबर
नोंदणी शुल्क:
बांधकाम कामगार भांडी योजनेचा अर्ज हा निशुल्क असणार आहे, या योजनेच्या अर्जासाठी किंवा भांडी संचसाठी बांधकाम कामगारांना कोणतेही शुल्क लागणार नाही.
Bandhkam Kamgar Bhandi Yojana Form Online Apply
1भांडी योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी सगळ्यात आधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा. वेबसाईट ओपन केल्यावर तिथे आपला कामगार नोंदणी क्रमांक द्या.नोंदणी क्रमांक दिल्यानंतर खाली दिलेल्या Send OTP बटनवर क्लीक करा.


त्यानंतर Select Camp/शिबीर निवडा या पर्यायांमधून जवळील भांडी वाटपाचे केंद्र निवडा.

भेटीची तारीख निवडल्यानंतर अपॉइंटमेंट प्रिंट करा यावर क्लिक करून फॉर्मची पीडीएफ काडून घ्या, त्याची प्रिंटाऊट तुम्हाला भांडी घेताना जवळ असणे आवश्यक आहे.

बांधकाम कामगार भांडी योजना ऑनलाईन फॉर्म
Bandhkam Kamgar Bhandi Yojana Form PDF
Bandhkam Kamgar Bhandi Yojana Form | Download |
Bandhkam Kamgar Bhandi Yojana Online Form Link | Click Here |
Bandhkam Kamgar Registration | Click Here |
Appointment Date Change | Click Here |
बांधकाम कामगार भांडी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या भांड्याची यादी

Bandhkam Kamgar Bhandi Yojana Status
बांधकाम कामगार भांडी योजनेसाठी अर्ज सादर केल्यानंतर तुम्ही थेट दिलेल्या तारखेवर केंद्रात जाऊन भांडी संच घेऊ शकता, परंतु जर तुम्हाला अर्जाची स्थिती चेक करायची असेल तर तुम्ही योजनेच्या पोर्टलवरून पात्र लाभार्थ्यांची जिल्हानिहाय यादी चेक करू शकता.
- सगळ्यात आधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटला उघडा.
- आता मेनू मध्ये Benefits Distributed वर क्लिक करा, व त्यानंतर Various Scheme Benefits Transferred पर्यायावर क्लिक करा.
- आता तुम्हाला तुमचा जिल्हा, लाभार्थ्यांचे नाव, बँक खाते क्रमांक, IFSC कोड इतर माहिती भरायची आहे.
- माहिती भरल्यानंतर योजनेचा प्रकार मध्ये भांडी संच पर्याय निवडा.
- यानंतर Search बटणवर क्लिक करा.
- आता आपल्यासमोर संपूर्ण लाभार्थ्यांची यादी उघडेल, या यादी मध्ये तुम्ही आपले नाव चेक करू शकता.
- या यादीमध्ये आपले नाव असेल तर आपला अर्ज भांडी संचसाठी स्वीकारला गेला आहे.