Ladki Bahin Yojana eKYC: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व महिलांना ई-केवायसी करण्याचे आदेश महाराष्ट्र शासना द्वारे देण्यात आले आहे, त्यासाठी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर केवायसी लिंक सक्रिय करण्यात आले आहे. लाभार्थी या लिंक द्वारे ऑनलाईन ई-केवायसी करू शकतात.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये होत असलेले गैरव्यवहार व घोटाळे थांबवण्यासाठी सर्व महिलांना केवायसी करणे अनिवार्य आहे. जर महिला केवायसी करणार नाही तर त्यांना योजनेतून वगळण्यात येईल व योजनेचा लाभ दिल्या जाणार नाही.
जर तुम्ही लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करायची असेल तर हा लेख पूर्ण वाचा, या मध्ये तुम्हाला केवायसी कशी करायची, कागदपत्रे, व पात्रताची पूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप सांगितले आहे, सोबतच केवायसी स्टेटस कशे चेक करायचं हे सुद्धा सांगितलं आहे.
Ladki Bahin Yojana eKYC
Ladki bahin yojana ची सुरुवात २८ जून २०२४ ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली, या योजने अंतर्गत राज्यातील २१ ते 65 वय वर्षोगटातील विवाहित, विधवा, निराश्रित व परिवारातील एक अविवाहित महिलेला प्रति महिना १५०० रुपयांचा लाभ दिला जातो.
पण या योजनेचा लाभ काही अपात्र महिला घेत होत्या व 14 हजारांपेक्षा जास्त महिलांचे कागदपत्रे देऊन पुरुष सुद्धा योजनेचा लाभ घेत होते, हि माहिती महिला व बाल विकास विभागाला दुसऱ्यांदा कागदपत्रांची पडताळणी दरम्यान समोर आली, म्हणून महाराष्ट्र शासनाद्वारे सर्व महिलांना ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व महिलांना केवायसी करण्यासाठी ladakibahin.maharashtra.gov.in या पोर्टलवर लिंक सक्रिय करण्यात आली आहे, या लिंक द्वारे महिला ekyc करू शकतात पण यासाठी महिलाच आधार कार्ड मोबाइल नंबरशी लिंक असले पाहिजे.
लाडकी बहीण योजना ई-केवायसीसाठी पात्रता
- महिला महाराष्ट्र राज्याची निवासी असावी.
- महिलेचं वय २१ ते ६५ वर्ष दरम्यान असावे.
- लाभार्थी जवळ आधार कार्डशी लिंक असलेलं बँक खाते असावे.
- महिलेच्या परिवारात चार चाकी वाहन नसावे.
- लाभार्थीच्या परिवाराचे वार्षिक उत्पन्न २.५० लाखापेक्षा कमी असावे.
- महिला व महिलेचं परिवार आयकर भरणारे किंवा सरकारी नौकरीवर नसावे.
लाडकी बहीण योजना ई-केवायसीसाठी कोणते कागदपत्र लागतील
Documentes for ladki bahin yojana ekyc online:
- लाभार्थी महिलेचं आधार कार्ड आधार कार्ड
- पती/वडिलांचे आधार कार्ड
- आधार कार्डशी लिंक मोबाइल नंबर
Ladki Bahin Yojana eKYC Online Process
1ई-केवायसी करण्यासाठी सर्वातआधी योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट दया, त्यानंतर ekyc link वर क्लिक करा.


यानंतर कॅप्चा भरून मी सहमत आहे पर्यायावर क्लिक करून ओटीपी पाठवा बटणवर क्लीक करा.




Majhi Ladki Bahin Yojana eKYC Last Date
लाडकी बहिण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई-केवायसी करणे बंधनकारक आहे, महिलांना दरवर्षी जुलै महिन्यानंतर ई-केवायसी करावी लागेल असा आदेश महिला व बाल विकास विभागाला महाराष्ट्र सरकार द्वारे देण्यात आली आहे, म्हणून वर्ष 2025 साठी योजनेच्या अधिकृत पोर्टलवर ekyc link सक्रिय करण्यात आली आहे.
Ladki bahin yojana ekyc last date 30 नोव्हेंबर असून सर्व महिलांना याआधीच केवायसी करावी लागेल, ज्या महिला ई-केवायसी पूर्ण करतील केवळ त्यांनाच योजनेचा लाभ दिल्या जाईल, महिला आधार कार्ड नंबरद्वारे ऑनलाईन केवायसी पूर्ण करू शकतात.
Mukhyamanntri Majhi Ladki Bahin Yojana eKYC Status
Majhi ladki bahin yojana ekyc maharashtra झाली आहे कि नाही, हे महिला केवायसी स्टेटस चेक करून जाणून घेऊ शकतात.
- सगळ्यात आधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटला उघडा, व ई-केवायसी लिंक वर क्लिक करा.
- यानंतर लाभार्थी आधार क्रमांक प्रविष्ट करा व कॅप्चा भरून मी सहमत आहे वर क्लीक करा.
- आता तुम्हाला ओटीपी पाठवा बटणवर क्लिक करायचे आहे.
- जर तुमची केवायसी झाली असेल तर “या आधार क्रमांकाची e-KYC प्रक्रिया पूर्ण झालेली आहे” असे लिहून असलेले पेज उघडेल.

Majhi Ladki Bahin Yojana eKYC FAQ
ladki bahin yojana ekyc link
https://ladakibahin.maharashtra.gov.in/ekyc
Ladki bahin maharashtra government in kyc online
योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व महिला https://ladakibahin.maharashtra.gov.in/ekyc या लिंक वरून केवायसी करू शकतात.