Bandhkam Kamgar Mofat Bhandi Yojana: महाराष्ट्र सरकार द्वारे चालवल्या जाणारी bandhkam kamgar yojana अंतर्गत आता लाभार्थी कामगारांना ३० भांड्यांचा संच व ५ हजार रुपये रोख रक्कम देण्यात येत आहे, मोफत भांडी योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांना अर्ज सादर करणे गरजेचं आहे, कामगार योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरून ऑनलाईन भांडी संच साठी अर्ज सादर करू शकतो, किंवा जवळील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळामध्ये भेट देऊन ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो.
राज्यातील गरीब कामगार ऊन, पाऊस, थंडीची पर्वा ना करता राज्याचा विकासात अनमोल वाटा असतो. कामगारांना संबंधित रास्ता, इमारत वा इतर बांधकाम काम पूर्णत्वास आल्यावर रोजगारासाठी नविन बांधकाम जेथे सुरु होते तेथे जावे लागते. त्यामुळे कामगाराला आपल्या परिवारासोबत स्थलांतर करावे लागते अशावेळी त्यांना नव्याने निवास, पाल्यांचे शिक्षण, आरोग्यविषयक समस्या व भोजन इत्यादीसाठी जुळवुन घ्यावे लागते.
याशिवाय दैनंदिन भोजन तयार करण्यास सहाय्य व्हावे म्हणून bandhkam kamgar yojana अंतर्गत रजिस्टर असलेल्या सर्व सक्रिय बांधकाम कामगारांना भांडी योजनेअंतर्गत गृहपयोगी वस्तू संच वितरण करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला. हा संच मिळवण्यासाठी कामगाराला योजनेच्या वेबसाईट वरून अर्ज करावा लागतो.
Bandhkam Kamgar Mofat Bhandi Yojana
कामगारांना नेहमी कामासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावं लागते, त्यामुळे त्यांना प्रत्येकी वेळी घरघुती उपयोगात येणारी भांडी घ्यावी लागते. गरिबीमुळे काही कामगार नवीन भांडी घेणं परवडत नाही, म्हणून कामगारांचा भांड्यांचा खर्च कमी करण्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाद्वारे नोंद असलेल्या कामगारांना mofat bhandi yojana च्या माध्यमातून ३० भांड्यांचा संच दिला जातो.
योजनेअंतर्गत देण्यात येणार भांडी संच २०,००० रुपये किमतीचा आहे, यामध्ये कामगाराला ४ ताट, ८ वाट्या, ४ पाण्याचे ग्लास, ३ वेगवेगळ्या आकाराचे पातेले झाकणास, १ मोठा चम्मच (भात वाढणी), १ मोठा चम्मच (वरण वाढणी), १ पाण्याचा जग, १ मसाला डब्बा (सात भाग असलेला), ३ वेगवेगळ्या आकाराचे डब्बे झाकणास, १ परात, १ प्रेशर कुकर (स्टेनलेस स्टीलचा), १ कढई, १ मोठी स्टीलची टाकी झाकणासह व वगराळासह अशी भांडी दिल्या जाते.
बांधकाम कामगार मोफत भांडी योजनांचे उद्देश्य
बांधकाम कामगार योजना हि महाराष्ट्रातील गरीब कामगारांना आर्थिक, सामाजिक आणि सुरक्षितता प्रदान करण्यासाठी महाराष्ट्र शासनाद्वारे राबवली जात आहे, या योजनेअंतर्गत ३७ अश्या मुख्य योजनेचा थेट लाभ नोंद असलेल्या कामगार दिल्या जाते, यामधीलच एक महत्वकांक्षी योजना बांधकाम कामगार मोफत भांडी योजना हि आहे. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्याला घरघुती उपयोगात येणारी भांडी दिल्या जाते.
बांधकाम कामगार भांडी योजनेचे मुख्य उद्देश्य राज्यातील गरीब कामगारांच्या परिवारात गृहउपयोगी भांडीचा खर्च कमी करून त्यांचे जीवनमान सुधारणे व आर्थिक सहायता प्रदान करून आत्मनिर्भर करणे आहे, योजनेच्या माध्यमातून लाभार्थी कामगाराला भांडी संच सोबतच ५ हजार रुपये सुद्धा दिले जाते.
बांधकाम कामगार भांडी योजनामध्ये खालील वस्तूंचा समावेश आहे
| गृहपयोगी संचातील वस्तू | नग |
| ताट | ०४ |
| वाटया | ०८ |
| पाण्याचे ग्लास | ०४ |
| पातेले झाकणासह | ०१ |
| पातेले झाकणासह | ०१ |
| पातेले झाकणासह | ०१ |
| मोठा चमचा (भात वाटपाकरीता) | ०१ |
| मोठा चमचा (वरण वाटपाकरीता) | ०१ |
| पाण्याचा जग (२ लीटर) | ०१ |
| मसाला डब्बा (७ भाग) | ०१ |
| डब्बा झाकणासह (१४ इंच) | ०१ |
| डब्बा झाकणासह (१६ इंच) | ०१ |
| डब्बा झाकणासह (१८ इंच) | ०१ |
| परात | ०१ |
| प्रेशर कुकर 5 लिटर (स्टेनलेस स्टील) | ०१ |
| कढई (स्टील) | ०१ |
| स्टीलची टाकी (मोठी) झाकणासह व वगराळासह | ०१ |
| एकूण | ३० |
बांधकाम कामगार भांडी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
Mofat Bhandi Yojana साठी खालील कागदपत्रे लागतील:
- ९० किंवा त्याहून अधिक दिवस काम केल्याचा दाखला
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- अंगठ्याचा ठसा
- स्व-घोषणा प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- निवास प्रमाणपत्र
- वय प्रमाणपत्र
- बँक खाते पासबुक
- मोबाइल नंबर
मोफत भांडी योजनेसाठी पात्रता
- अर्जदार कामगार महाराष्ट्र राज्याचा असावा.
- कामगारांचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
- कामगाराची कामगार बांधकाम कामगार कल्याण मंडळामध्ये नोंद असावी.
- लाभार्थ्याने या आधी योजनेअंतर्गत भांडी संच प्राप्त केलेला नसावा.
- कामगारांचे वय १८ वर्षापेक्षा कमी असावे.
- कामगाराने मागील वर्षात 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असावे.
Bandhkam Kamgar Mofat Bhandi Yojana Online Registration
- बांधकाम कामगार मोफत भांडी योजनेसाठी कामगार hikit.mahabocw.in/appointment या पोर्टलवरून अर्ज सादर करू शकतात।
- सगळ्यात आधी mofat bhandi yojana लिंकवर क्लिक करा.
- पोर्टल उघडल्यावर BOCW कामगार नोंदणी क्रमांक / BOCW Registration Number या पर्यायामध्ये रजिस्ट्रेशन नंबर प्रविष्ट करा. आणि खाली दिलेल्या “Send OTP” बटणवर क्लिक करा.

- आता तुमच्या रजिस्टर असलेल्या मोबाइलला क्रमांकावर ओटीपी येईल, हा ओटीपी वेबसाईट मध्ये प्रविष्ट करा व “Verify OTP” बटणवर क्लिक करा.

- त्यानंतर मोफत भांडी योजनेचा ऑनलाईन अर्ज उघडेल, इथे मागितलेली सर्व माहिती भरा आणि जवळील “Select Camp/शिबीर” पर्यायांमधून भांडी वाटपाचे केंद्र निवडा.

- आता लाभार्थ्यांना Date of appointment/भेटीची तारीख पर्यायावर क्लीक करून तारीख निवडायची आहे, निवडलेल्या तारखेला कामगाराला भांडी संच दिल्या जाईल.
- तारीख निवडल्या नंतर अपॉइंटमेंट प्रिंट करा यावर क्लिक करून पीडीफ डाउनलोड करून घ्या, हि पावती भांडी संच घेताना तुम्हाला दाखवावी लागेल.

मोफत भांडी योजना यादी
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या भांडी संच साठी सरकारद्वारे अधिकृत पोर्टलवर यादी जाहीर केल्या जाते, हि यादी कामगार आपल्या मोबाइलला फोनद्वारे ऑनलाईन चेक करू शकतात. जर ऑनलाईन यादी चेक करण्यात असमर्थ आहे तर रजिस्टर असलेल्या मोबाइल क्रमांकावर SMS द्वारे कळवल्या जाईल.
Mofat bhandi yojana list अशी चेक करा.
- सगळ्यात आधी बांधकाम कामगार पोर्टल उघडा.
- यानंतर होमपेज मध्ये लाभ वितरित यावर क्लिक करा.
- आता नवीन पेज उघडेल इथे तुमचा जिल्हा, नाव, बँक खाते क्रमांक, IFSC कोड प्रविष्ट करून “Search” बटनवर क्लिक करा.
- त्यानंतर लाभार्थ्यांची यादी उघडेल, कामगार या यादीमध्ये आपले नाव तपासू शकते.
- या यादीत नाव असल्यास लाभार्थ्याला ३० भांड्यांचा संच देण्यात येईल.
Mofat Bhandi Yojana Form PDF Download
| Bandhkam Kamgar Bhandi Yojana Form | Download |
| Bandhkam Kamgar Bhandi Yojana Online Form Link | Click Here |