Bandhkam Kamgar Yojana Smart Card: बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेत असल्याल्या सर्व कामगारांसाठी महाराष्ट्र शासनाद्वारे smart card जाहीर केलेले आहे, ज्यूमुळे नोंद असलेल्या कामगारांची ओळख करता येईल व त्यांना इतर योजनांचा लाभ घेण्यासाठी जास्त धडपड व कागदपत्रे लागणार नाही, bandhkam kamgar smart card जोडून ते महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाद्वारे राबवल्या जात असलेल्या ८४ योजनांचा थेट लाभ घेऊ शकतात.
महाराष्ट्रात लाखो बांधकाम कामगार आहेत जे दररोज त्यांच्या कठोर परिश्रमाने शहरे आणि गावे यांचा विकास करतात, परन्तु यापैकी बरेच कामगार अशे आहेत ज्यांना सरकारी योजनांविषयी माहिती नाही किंवा अर्ज प्रक्रियेत अडचणींना सामोरे जावे लागते. यावर उपाय म्हणून आता कामगारांना स्मार्ट कार्ड दिल्या जात आहे, यामुळे सरकार या कामगारांपर्यंत योजनांचा थेट पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवते, जेणेकरून कोणताही कामगार त्यांच्या हक्कांपासून वंचित राहणार नाही.
Bandhkam Kamgar Yojana Smart Card
Bandhkam kamgar yojana smart card हे महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना ओळख आणि सर्वबांधकाम कामगार योजनांचा लाभांमध्ये प्रवेश प्रदान करण्यासाठी महाराष्ट्र शासनाद्वारे उचललेले एक पाऊल आहे. हे कार्ड केवळ एक ओळख नाही तर सुरक्षितता आणि प्रतिष्ठेचे एक नवीन प्रतीक आहे.
जस आधार कार्ड आहे तसंच स्मार्ट कार्ड आहे, हे स्मार्ट कार्ड बांधकाम कामगाराचे ओळखपत्र सुद्धा समजू शकता, यामुळे आता कामगारांना मिळणार शैक्षणिक, आर्थिक, पेंशन, विमा आणि आरोग्य सहाय्य सारख्या योजनांचा लाभ फक्त या bandhkam kamgar smart card द्वारे मिळवू शकतात.
बांधकाम कामगार स्मार्ट कार्डवर काय असते
Bandhkam kamgar smart card वर खालील माहिती असते:
- कामगारांचा नोंदणी क्रमांक.
- कामगाराचे नाव.
- कामगाराचे लिंग.
- कामगाराची जन्म तारीख.
- मोबाईल क्रमांक.
- कामगाराचा पत्ता.
- जिल्हा व निंदणीचे ठिकाण.
- वैधता तारीख.
- नोंदणीची तारीख.
- कामाचा प्रकार.
असे राहील बांधकाम कामगार योजनेचं स्मार्ट कार्ड

बांधकाम कामगार योजना स्मार्टकार्ड साठी आवश्यक अटी व पात्रता
- कामगार महाराष्ट्र राज्याचा निवासी असावा.
- स्मार्ट कार्डसाठी कामगारांचे किमान वय १८ वर्ष पूर्ण असावे.
- अर्जदाराने मागील 12 महिन्यांमध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले केलेले असावे.
- कामगार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात रजिस्टर असावा.
- कामगारांकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
स्मार्ट कार्ड डाउनलोड करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
Bandhkam kamgar yojana smart card साठी खालील कागदपत्रे लागतील:
- आधार कार्ड
- ९० दिवस काम केल्याचा पुरावा
- नोंदणी क्रमांक
- मोबाइल नंबर
Bandhkam Kamgar Smart Card Apply Online
बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड बनविण्यासाठी कामगारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज, किंवा कागदपत्र ऑनलाईन किंवा ऑफलाईन द्यावे लागत नाही. जर कामगाराने नोंद केलेली असेल तर त्यांचे स्मार्ट कार्ड प्रोफाइल मध्ये जनरेट होते, तिथून कामगार हे bandhkam kamgar yojana smart card download करू शकतात, व मिळणाऱ्या योजनांचा लाभ घेऊ शकतात.
स्मार्ट कार्ड फक्त नोंद असलेले कामगार डाउनलोड करू शकतात, ज्यांचं नूतनीकरण झालेलं आहे त्यांना सुद्धा हे कार्ड दिल्या जात, परंतु जर नूतनीकरण झालेले नसेल तर त्यांना आधी नूतनीकरण (रिनिवल) करावे लागेल त्यानंतरच ते कामगार bandhkam kamgar smart card डाउनलोड करू शकते.
Bandhkam Kamgar Yojana Smart Card Download कशे करावे
1Bandhkam kamgar स्मार्ट कार्ड डाउनलोड करण्यासाठी योजनेची अधिकृत वेबसाईट ओपन करा, व त्यानंतर होम पेज वरील Construction Worker:Profile Login बटणवर क्लिक करा.


त्यानंतर E-card Registration Print बटणवर क्लिक करायचे आहे.

यानंतर स्मार्ट कार्ड डाउनलोड होऊन जाईल, या पद्धतीने तुम्ही योजनेचं smart card डाउनलोड करू शकता.

बांधकाम कामगार स्मार्ट कार्डाचे फायदे
- कामगारांना Bandhkam Kamgar योजनांचा लाभ मिळणे सोयीस्कर होते.
- कामगाराची नोंदणी झाल्याचा पुरावा मिळतो.
- योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आरोग्य विमा आणि इतर विमा योजनांसाठी दावे करण्यासाठी कामगार स्मार्ट कार्डचा उपयोग करू शकतात.
- कामगार ओळखपत्र म्हणून स्मार्ट कार्ड वापरू शकतात.
Bandhkam Kamgar Yojana Smart Card FAQ
स्मार्ट कार्ड हरवले तर
स्मार्ट कार्ड हरवले तर हेल्पलाईन नंबर वर संपर्क करून तक्रार करा व पोर्टलवरून नवीन स्मार्ट कार्ड डाउनलोड करा.
कामगार कार्ड कोणाला मिळते?
bandhkam kamgar smart card फक्त महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेत असलेल्या कामगारांना दिल्या जाते.
बांधकाम कार्ड कोठे मिळते?
कामगार बांधकाम कामगार कार्ड योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरून डाउनलोड करू शकतात.
बांधकाम कामगारांना स्मार्ट कार्ड द्वारे कोणकोणत्या योजनांचा लाभ मिळतो?
bandhkam kamgar yojana smart card द्वारे कामगार कल्याण विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या ८४ पेक्षा जास्त योजनांचा लाभ दिला जातो.