Ladki Bahin Yojana 21th Installment Release 2026: महिलांच्या खात्यात 21वा हप्ता जमा होण्यास सुरुवात, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Ladki Bahin Yojana 21th Installment Release 2026: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना अंतर्गत महाराष्ट्रातील महिलांसाठी अखेर मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाने लाडकी बहिन योजनेचा 21वा हप्ता 13 मे 2026 पासून वितरित करण्यास सुरुवात केली असून अनेक महिलांच्या बँक खात्यात DBT द्वारे ₹1500 जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

यावेळी मार्च महिन्याचा हप्ता दोन टप्प्यांत वितरित केला जाणार आहे. पहिला टप्पा 13 मेपासून सुरू झाला असून दुसरा टप्पा 15 मेपासून सुरू होणार आहे. त्यामुळे काही महिलांना आजच लाभ मिळेल तर उर्वरित लाभार्थींना पुढील टप्प्यात रक्कम जमा केली जाईल.

मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील 65 लाखांहून अधिक अपात्र महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे. आता केवळ 1 कोटी 77 लाख पात्र महिलांनाच 21व्या हप्त्याचा लाभ दिला जाणार आहे. eKYC अपूर्ण असलेल्या, चुकीची माहिती भरलेल्या किंवा पात्रता निकष पूर्ण न करणाऱ्या महिलांना योजनेतून हटवण्यात आले आहे. जर तुम्हालाही अद्याप हप्ता मिळाला नसेल तर घाबरू नका. शासनाकडून 15 मेपर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात हप्त्याची रक्कम जमा केली जाणार आहे.

Ladki Bahin Yojana 21th Installment Release Overview

घटकमाहिती
योजनेचे नावलाडकी बहिन योजना
लाभमहिलांना दरमहा ₹1500
सुरू करणारेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
योजना सुरूमहाराष्ट्र अंतरिम अर्थसंकल्प 2024
लाभार्थीमहाराष्ट्रातील महिला
वयोमर्यादा21 ते 65 वर्षे
उद्देशमहिला सक्षमीकरण व स्वावलंबन
आर्थिक सहाय्य₹1500 प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन / ऑफलाइन
अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in

Ladki Bahin Yojana 21th Installment Release

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना ही राज्यातील गरीब विवाहित, विधवा, निराधार, परित्यक्ता तसेच कुटुंबातील एका अविवाहित महिलेसाठी राबवली जात आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, कुटुंबातील त्यांची भूमिका मजबूत करणे आणि पोषणामध्ये सुधारणा घडवून आणणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹1500 आर्थिक मदत थेट DBT प्रणालीद्वारे त्यांच्या बँक खात्यात पाठवली जाते.

गेल्या दोन महिन्यांपासून अनेक महिलांना मार्च आणि एप्रिल हप्त्याचा लाभ मिळाला नव्हता. त्यामुळे लाखो महिला पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होत्या. आता महिला व बालविकास विभागाने अखेर 21वा हप्ता जारी केला आहे. 13 मे ते 15 मे दरम्यान दोन टप्प्यांत 1 कोटी 77 लाख महिलांच्या खात्यात मार्च महिन्याचे ₹1500 जमा केले जाणार आहेत.

पहिल्या टप्प्यात या 25 जिल्ह्यांना लाभ

13 मेपासून सुरू झालेल्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, धाराशिव, पालघर आणि परभणी जिल्ह्यातील महिलांना हप्त्याचा लाभ दिला जाणार आहे. इतर जिल्ह्यांतील लाभार्थींना 15 मेपासून दुसऱ्या टप्प्यात पैसे जमा केले जातील.

या महिलांना मिळणार नाही 21वा हप्ता

जरी शासनाने Ladki Bahin Yojana 21th Installment Release केला असला तरी सर्व महिलांना याचा लाभ मिळणार नाही. यावेळी केवळ 1 कोटी 77 लाख पात्र महिलांनाच हप्ता दिला जाणार आहे. ज्या महिलांनी eKYC पूर्ण केलेले नाही, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.50 लाखांपेक्षा जास्त आहे किंवा कुटुंबात चारचाकी वाहन आहे अशा महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. तसेच चुकीची कागदपत्रे सादर केलेल्या महिलांनाही योजनेतून वगळण्यात आले असून त्यांना मार्च महिन्याचा 21वा हप्ता मिळणार नाही.

Ladki Bahin Yojana 21th Installment Status कसा तपासावा?

  • सर्वप्रथम MMBLY ची अधिकृत वेबसाइट उघडा
  • “अर्जदार लॉगिन” पर्यायावर क्लिक करा
  • मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा
  • लॉगिन झाल्यानंतर “Application Submitted” वर क्लिक करा
  • “Application Status” मध्ये अर्जाची स्थिती तपासा
  • अर्जाची स्थिती “Approved” असणे आवश्यक आहे
  • त्यानंतर “Actions” मधील रुपये चिन्हावर क्लिक करा
  • आता नवीन पेजवर हप्त्याचे पेमेंट तपशील पाहता येतील

निष्कर्ष

Ladki Bahin Yojana 21th Installment Release झाल्यामुळे महाराष्ट्रातील लाखो महिलांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. सरकारकडून पात्र महिलांच्या खात्यात थेट DBT द्वारे रक्कम जमा केली जात असून सर्व लाभार्थींनी आपले eKYC आणि बँक तपशील अपडेट ठेवणे आवश्यक आहे. ही योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अत्यंत महत्त्वाची ठरत आहे.

Note:- Ladki Bahin Yojana 21th Installment Release दोन टप्प्यांत दिला जात असल्यामुळे काही महिलांना पैसे मिळण्यास उशीर होऊ शकतो. त्यामुळे 15 मेपर्यंत प्रतीक्षा करावी. हप्ता जमा झाल्यानंतर बँकेकडून SMS पाठवला जाईल. जर SMS मिळाला नाही तर Google Pay, PhonePe, नेटबँकिंग किंवा पासबुक अपडेट करून रक्कम जमा झाली आहे का ते तपासता येईल.

Ladki Bahin Yojana 21th Installment Release Important Links

लाडकी बहीण योजना वेबसाइटClick here
Helpline Number181
Join WhatsAppJoin Whatsapp
HomepageClick here

Leave a Comment