Senior Citizen Scheme Employee: महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्वाची आणि मोठी घोषणा केलेली आहे, राज्यात लवकरच Senior Citizen Scheme लागू करण्यात येणार आहे, या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना ७००० रुपये प्रति महिना पेंशन दिल्या जाणार आहे सोबतच जर ज्येष्ठ नागरिकाचे पाल्य त्यांचे पालन पोषण नसेल करत तर त्यांना आवास आणि भोजनाची व्यवस्था देखील जेष्ठ नागरिक योजनेच्या माध्यमातून केल्या जाणार आहे.
Senior Citizen Scheme Employee
आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या गरीब ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाचे आणि सुरक्षित जीवन जगता यावे या उद्देश्याने महाराष्ट्र सरकार द्वारे जेष्ठ नागरिक योजना (Senior Citizen Scheme Employee) सुरु करण्यात येत आहे, या योजनेबद्दल नुकतीच घोषणा आमदार डॉ. राहुल वेदप्रकाश पाटील यांच्याद्वारे करण्यात आलेली आहे, आणि अर्ज प्रक्रिया सुद्धा सुरु होणार आहे.
गरिबीमुळे राज्यातील जेस्ट नागरिकांना औषधी व जीवनाआवश्यक वस्तूंसाठी इतरांवर अवलंबून राहावे लागते, जर जेष्ठ नागरिकांना वारस नसेल तर त्यांना जीवन जगणे देखील कठीण होते, यासाठीच हि योजना सुरु करण्यात येत आहे, योजने अंतर्गत लाभार्थी जेस्ट नागरिकांना पेंशन सोबतच महाराष्ट्र दर्शनासाठी आर्थिक मदद व ५ लाखांपर्यंतचा मोफत आरोग्य सेवा देखील मिळणार आहे.
योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या ५ मोठ्या सुविधा
| क्र. | सुविधा (Benefit) | तपशील (Details) |
| १. | ₹७,००० मासिक मानधन | दैनंदिन खर्चासाठी मोठा आधार म्हणून दरमहा ₹७,००० इतकी आर्थिक मदत दिली जाईल. |
| २. | ₹५ लाखांपर्यंत मोफत आरोग्य सेवा | शासकीय किंवा निमशासकीय रुग्णालयांमध्ये आजारी पडल्यास ₹५ लाखांपर्यंतची मोफत आरोग्य सेवा पुरवली जाईल. |
| ३. | महाराष्ट्र दर्शनासाठी अनुदान | राज्यातील ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय स्थळांना भेटी देण्यासाठी दरवर्षी ₹१५,००० पर्यंतचे पर्यटन अनुदान (Travel Grant) दिले जाईल. |
| ४. | निवास आणि भोजन | ज्या ज्येष्ठ नागरिकांना कोणताही वारस नाही किंवा ज्यांची मुले काळजी घेत नाहीत, त्यांच्यासाठी शासन स्वतःहून राहण्याची (निवास) आणि जेवणाची (भोजन) सोय उपलब्ध करून देणार आहे. |
| ५. | विशेष टोल-फ्री हेल्पलाइन | समस्या आणि तक्रारींचे जलद निवारण करण्यासाठी एक विशेष टोल-फ्री हेल्पलाइन सुरू केली जाईल. |
जेष्ठ नागरिक पेंशन योजनेसाठी आवश्यक पात्रता
- योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातील जेष्ठ नागरिक पात्र ठरतील.
- अर्जदार जेष्ठ नागरिकाचे वय ६५ वर्षापेक्षा जास्त असावे.
- अर्जदार अन्य योजनेअंतर्गत पेंशन धारक नसावा.
- जेष्ठ नागरिकांकडे आधार कार्ड सोबत लिंक असलेले बँक खाते असावे.
जेष्ठ नागरिक पेंशन योजना महाराष्ट्रासाठी अर्ज कसा करायचा
जेष्ठ नागरिक पेंशन योजनेसाठी अद्याप अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आलेली नाही, २ जुलै २०२४ रोजी हे विधेयक (Bill) विधानसभेत सादर करण्यात आलेले आहे, योजनेला मंजुरी मिळाल्या नंतर ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमातून अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात येईल, योजनेच्या अटी आणि शर्ती पूर्ण करण्याऱ्या नागरिकांना योजनेचा लाभ मिळेल.