Crop Insurance Bharpai 2025: महाराष्ट्र राज्यात होत असलेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई देण्यात येतंय, यासाठी शासनाद्वारे ३५ जिल्ह्यांमधील एकूण ९३,९४,८३८ लाभार्थी शेतकऱ्यांसाठी ₹७,३३७ कोटी ८९ लाख रुपयांच्या निधीला मान्यता शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे, सोबतच लाभार्थी शेतकऱ्यांची Ativrushti Nuskan Bharpai Beneficiary List 2025 देखील जाहीर करण्यात आलेली आहे.
Crop Insurance Bharpai 2025
संपूर्ण महाराष्ट्र राज्यात जून महिन्यापासून होत असलेल्या वेगवान पावसामुळे शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झालेले आहे, ज्या मध्ये पीकहाणी, जीवितहानी, पशुहानी, आणि मालमत्तेची हानी झालेली आहे, अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे नुकसान झालेल्या परिवरांना सरकारद्वारे आर्थिक साहाय्य जाहीर करण्यात आलेले आहे. यात जिल्ह्यावर मदद वाटप केल्या जाणार आहे.
शेतकऱ्यांना मंजूर झालेली मंदतेची रक्कम थेट बँक खात्यात महाडीबीटी (MahaDBT) प्रणालीद्वारे जमा केल्या जाईल. अनुदान प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांना ऍग्रीस्टेक पोर्टलवरून केवायसी करावी लागेल, आणि लाभार्थ्यांचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे गरजेचे आहे.
राज्यातील २० जिल्ह्यांसाठी Crop Insurance Bharpai मंजूर
| विभाग (Division) | समाविष्ट जिल्हे (Included Districts) | मंजूर रक्कम (Approved Amount) |
| छत्रपती संभाजीनगर | हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव | ₹७२१.९७ कोटी |
| अमरावती | अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा | ₹५६५.६० कोटी |
| नागपूर | गोंदिया, गडचिरोली, भंडारा, नागपूर, वर्धा | ₹२३.८५ कोटी |
| पुणे | कोल्हापूर | ₹१४.२८ कोटी |
| नाशिक | नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, अहिल्यानगर | ₹१३.७७ कोटी |
नुकसान भरपाईचे महत्त्वाचे नियम
शासनाद्वारे सरसकट नुकसान भरपाई वितरणासाठी दर आणि मर्यादा निश्चित केल्या आहेत, सध्याचा दर ₹८,५०० प्रति हेक्टर असून सध्याची मदत जास्तीत जास्त दोन हेक्टरच्या मर्यादेत वितरित केली जात आहे, सोबतच शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठीचे ₹१०,००० प्रति हेक्टर अनुदान स्वतंत्रपणे वाटप केले जाईल.
शेतकऱ्यांच्या मदतीत मोठी कपात!
अतिवृष्टी नुकसान भरपाई मध्ये यापूर्वी शेतकऱ्यांना ३ हेक्टरपर्यंतच्या नुकसानीसाठी मदत मिळत होती. परंतु यात कपात करण्यात आलेली आहे, आता लाभार्थी शेतकऱ्याला जास्तीत जास्त २ हेक्टरपर्यंतचा लाभ देण्यात येईल, सोबतच जिल्ह्यानुसार जिथे कमी किंवा जास्त पाऊसामुळे नुकसान झालेले आहे तिथे मदतीच्या प्रति हेक्टर दरातही कपात केली आहे. शेतकरी शासन निर्णयामधून पूर्ण माहिती घेऊ शकतो.
Ativrushti Nuskan Bharpai Beneficiary List 2025
- सगळ्यात आधी खाली दिलेली लिंक उघडा व ‘व्हिके नंबर’ (VK Number) प्रविष्ट करा.
- तपासणी लिंक:
https://mh.disastermanagement.mahait.org/PaymentStatus
- तपासणी लिंक:
- यानंतर दिलेल्या Submit बटणवर क्लिक करा.
- आता नवीन पेज उघडेल इथून तुम्ही अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र आहे कि नाही ते तपासू शकता.
इंटरनेट नसलेल्या शेतकऱ्यांसाठी ऑफलाईन यादी चेक करण्यासाठी पर्याय
जर शेतकरी ऑनलाईन माध्यमातुन अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी चेक करण्यास असमर्थ असेल तर ऑफलाईन माध्यमातून देखील हि लाभार्थी यादी चेक करू शकतात. शेतकरी पटवारी, तलाठी किंवा ग्रामसेवक कार्यालय, ग्रामपंचायत केंद्र मधून ऑफलाईन लाभार्थ्यांची यादी पाहू शकतात, याशिवाय तालुका कृषी अधिकारी कार्यालय, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालय किंवा जवळील CSC केंद्रातून देखील हि लिस्ट चेक करता येते.