Ladki Bahin Yojana 16th Installment: महाराष्ट्र सरकार द्वारे महिलांसाठी गोड बातमी जाहीर केलेली आहे, दिवाळी नंतर महिलांना आता ऑक्टोबर महिन्याचा हफ्ता वाटप करण्यात येणार आहे, यासाठी पात्र महिलांची निवड सुद्धा करण्यात आलेली आहे आणि लाभार्थ्यांची यादी सोबतच लाडकी बहीण योजना 16वा हफ्ता वाटपासाठी नवीन शासन निर्णय सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे.
लाभार्थी महिलांची यादी महिला नगरपालिकेच्या अधिकृत पोर्टलवरून करू शकते किंवा ग्रामपंचायत कार्यालय, आणि अंगणवाडी केंद्रातून ऑफलाईन यादी चेक करू शकतात. ज्या महिलांचे नाव या यादीत समाविष्ट आहे त्यांनाच योजनेचा लाभ मिळेल, याशिवाय महिलेचं बँक खात आधार कार्ड सोबत लिंक असणे गरजेचं आहे. १६व हफ्ता कधी मिळेल जाणून घेण्यासाठी लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
Ladki Bahin Yojana 16th Installment
माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील गरीब महिलांना आर्थिक साहाय्य करण्यासाठी व सबलीकरणासाठी चालवण्यात येणारी महत्वकांक्षी योजना आहे, या योजनेअंतर्गत राज्यातील २१ वर्ष ते ६५ वर्ष वयोगटातील लाभार्थींना प्रति महिना १५०० रुपये दिले जाते.
योजनेअंतर्गत महिलांना आत्तापर्यंत १५ हफ्त्यांचा वाटप झाला असून आता सरकार १६वा हफ्त्याचा वाटप करणार आहे त्यासाठी पूर्ण तयारीसुद्धा झालेली आहे, आणि आता लवकरच महिलांच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे १५०० रुपये जमा होईल, महिलांना अंदाजे ४ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबरच्या दोन टप्प्यात दिल्या जाऊ शकते.
लाडकी बहीण योजना 16 हफ्ता कधी मिळेल
लाडकी बहीण योजनेची १६वि किस्त वाटप करण्याकरिता शासनाद्वारे नवीन शासन निर्णय जाहीर करण्यात आलेले आहे, ज्या निर्णयानुसार महिलांना १६वा हफ्ता वाटप करण्यासाठी ४१०.३० कोटी इतकी रक्कम मान्य करून महिला व बाल विकासाला देण्यात आलेली आहे, आणि आता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात लाभार्थींना १६वा हफ्ता वाटप केल्या जाणार आहे. महिलांना जर योजनेचा हफ्ता नाही मिळाला तर त्या हेल्पलाईन नंबरद्वारे किंवा अधिकारीक वेबसाईट मध्ये दिलेल्या ग्रीव्हन्स फॉर्म द्वारे तक्रार नोंद करू शकते.
या महिलांना मिळेल 3000 रुपये
लाडक्या बहिणींना योजनेअंतर्गत डीबीटी द्वारे आर्थिक लाभ दिला जातो, परंतु लाखो अश्या महिला असतात ज्यांना डीबीटी प्रणालीत खराबी मुले योजनेचा हफ्ता मिळत नाही, असच सप्टेंबर हफ्ता वाटपाच्या वेळेस झालेलं आहे, म्हणून ज्या महिलांना सप्टेंबरचा हफ्ता मिळाला नाही त्यांना आता १५वा आणि १६ वा हफ्ता एकत्रित मिळणार आहे, यामध्ये त्यांना ३००० रुपये मिळतील. याशिवाय ज्या महिलांना जुलै महिण्यापासून योजनेचा लाभ नाही मिळाला त्यांना सुद्धा जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, आणि ऑक्टोबर अश्या चार महिन्याचा लाभ एकत्रित दिला जाणार आहे.
लाडकी बहीण योजना 16वि किस्तीसाठी ई-केवायसी पाहिजे
माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांची ओळख करता यावी यासाठी महाराष्ट्र शासनाद्वारे लाभार्थी महिलांना ई-केवायसी करण्याचे आदेश दिले होते, परंतु खूप महिलांची केवायसी अद्याप झालेली नाही म्हणून आता या महिलांना ladki bahin yojana 16th installment मिळेल का याची शंका आहे.
मागील महिन्यात १५वा हफ्ता महिलांना बिना केवायसीचा देण्यात आला, तसाच योजनेचा १६वा हफ्ता सुद्धा महिलांना मिळणार आहे, पण नोव्हेंबर महिन्यात महिलांना योजनेचा लाभ घेण्यासाठी केवायसी करावीच लागेल ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख १८ नोव्हेंबर २०२५ आहे.
लाडकी बहीण योजना 16वि किस्तसाठी पात्रता
Ladki bahin yojana 16th installment साठी लाभार्थी महिलांना खालील पात्रतांना पूर्ण करणे गरजेचं आहे.
- महिला महाराष्ट्राची निवासी असली पाहिजे.
- लाभार्थीच वय २१ वर्षापेक्षा जास्त व ६५ वर्षापेक्षा कमी असलं पाहिजे.
- महिलेच्या परिवारात चार चाकी वाहन नसावे.
- महिलेच्या परिवारातील सदस्य सरकारीकर्मचारी व आयकरदाता नसावे.
- लाभार्थी महिलेचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असून डीबीटी ऑन असले पाहिजे.
- महिलेच्या परिवाराचे वार्षिक उत्पन्न २.५० लाखांपेक्षा जास्त नसावे.
Ladki Bahin Yojana 16th Installment Status
Ladki bahin yojana 16th installment वाटप सुरू झाला आहे, महिला खालील दिलेल्या माहितीप्रमाणे योजनेच्या पोर्टलवरून किस्त वाटपाची पूर्ण माहिती जाणून घेऊ शकते, व १६व्या हफ्त्याची स्थिती सुद्धा पाहू शकते.
- लाडकी बहीण योजना १६वीं किस्तीची स्थिती चेक करण्यासाठी अधिकृत वेबसाईट ladakibahin.maharashtra.gov.in ओपन करा.
- त्यानंतर होमपेजवर अर्जदार लॉगिन पर्यावर क्लीक करा.
- आता तुमच्यासमोर लॉगिन पेज उघडेल, इथे मोबाईल नंबर व पासवर्ड प्रविष्ट करा आणि कॅप्चा भरून लॉगिन बटणवर क्लीक करा.
- वेबसाईटमध्ये लॉगिन केल्यानंतर या पूर्वी केलेले अर्ज या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हाला Actions पर्यायामध्ये रुपयेवर क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्यासमोर नवीन विंडो उघडेल, इथून महिला १६वीं किस्त चे स्टेटस चेक करू शकते.