Ladki Bahin Yojana eKYC Online Process: महाराष्ट्र शासनाद्वारे चालवण्यात येणारी माझी लाडकी बहीण योजनेसाठी मात्र आता महिलांना ई-केवायसी करणे बंधनकारक ठरलं आहे, यामुळे योजनेसाठी पात्र व अपात्र महिलांची ओळख करता येईल व फक्त पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ देता येईल. याशिवाय अपात्र महिलांना योजनेतून वगळून आणखी गरजू महिलांपर्यंत योजना पोहचवली जाईल. लाभार्थी महिला त्यांच्या आधार कार्डद्वारे ऑनलाइन लाडकी बहीण योजना ई-केवायसी करू शकतात.
केवायसी करण्यासाठी सरकारद्वारे योजनेच्या वेबसाईटवर लिंक सक्रिय करण्यात आली आहे, या लिंकद्वारे महिला केवायसी करू शकतील पण त्यासाठी महिलेचा आधार कार्ड मोबाईल क्रमांकाशी लिंक असं गरजेचं आहे, त्याचसोबत महिलेच्या परी/वडिलांचे सुद्धा आधार कार्ड मोबाइलला क्रमांकाशी लिंक असावे.
Ladki Bahin Yojana eKYC
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकार द्वारा महिला सशक्तीकरणाला चालना देण्यासाठी व महिलांच्या पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी २८ जून २०२४ पासून राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला १५०० रुपये प्रति महिन्याची आर्थिक सहायता दिली जाते. अनुदान रक्कम थेट लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात डीबीटी द्वारा जमा केली जाते.
या योजनेच्या माध्यमातून गरीब व गरजू महिलांना लाभ मिळावा यासाठी मात्र सरकार द्वारे ई-केवायसी प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे, ज्या महिला योजनेचा लाभ घेत आहे त्यांना आधार कार्ड द्वारे केवायसी करणे बंधनकारक आहे. ज्या महिला ई-केवायसी करणार नाही त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात येणार नाही. पात्र लाभार्थी योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरून ladki bahin yojana ekyc online process करू शकतात.
लाडकी बहिण योजना ई-केवायसीसाठी पात्रता
- लाडकी बहीण योजनेसाठी महाराष्ट्रातील महिला पात्र असतील.
- महिलेचं वय २१ वर्ष ते ६५ वर्ष्याच्या दरम्यान असावे.
- लाभार्थी महिलेकडे आधार कार्डशी लिंक असलेलं बँक खाते असावे.
- महिला आयकारदाता नसावी.
- लाभार्थीच्या परिवाराचे वार्षिक उत्पन्न २.५० लाखांपेक्षा जास्त नसावे.
- महिलेकडे चार चाकी वाहन नसावे.
माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
Majhi ladki bahin yojana ekyc online process साठी खालील कागदपत्रे लागतील
- महिलेचं आधार कार्ड
- महिलेच्या वडिलांचे/पतीचे आधार कार्ड
- आधार कार्डशी लिंक असलेला मोबाइल क्रमांक
Ladki Bahin Yojana eKYC Online Process मोबाईल द्वारे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई-केवायसी करण्यासाठी सगळ्यात आधी योजनेच्या अधिकृत वेबसाईट ladakibahin.maharashtra.gov.in ओपन करा.
आता अधिकृत पोर्टलच्या होमपेजवर “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लीक करा” या पर्याय वर क्लीक करा.

त्यानंतर नवीन पेज उघडेल, इथे लाभार्थी महिलेचं आधार कार्ड क्रमांक प्रविष्ट करा व कॅप्चा प्रविष्ट करा. आणि “मी सहमत आहे” या पर्यायाला निवडून “ओटीपी पाठवा” बटनावर क्लिक करा.

आता लाभार्थी महिलेच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईलवर ओटीपी येईल, आलेला ओटीपी पोर्टलमध्ये प्रविष्ट करून “सबमिट करा” बटणवर क्लीक करा.

ओटीपी वेरिफिकेशन केल्यानंतर नवीन पेज ओपन होईल, इथे महिलेच्या पती/वडिलांचे आधार कार्ड नंबर प्रविष्ट करा व कॅप्चा भरा. आणि त्यानंतर “मी सहमत आहे” या पर्यायावर क्लिक करून “ओटीपी पाठवा” बटणवर क्लिक करा.

आता महिलेच्या पती/वडिलांच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाइलला क्रमांकावर ओटीपी येईल, हा ओटीपी वेबसाईट मध्ये टाकून “सबमिट करा” यावर क्लिक करा.

आता ladki bahin yojana ekyc online process चा अंतिम पेज उघडेल, इथे महिलेला जाती प्रवर्ग निवडायचा आहे. त्यानंतर जर महिलेच्या परिवारातील सदस्य सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक आहे तर “नाही” हा पर्याय निवडा, आणि जर लाभार्थीच्या परिवारातील सदस्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक सुद्धा नाही तर “होय” पर्याय निवडा.
याचप्रकारे जर एकाच कुटुंबातील दोन पेक्षा जास्त महिला योजनेचा लाभ घेत असेल तर “नाही” वर क्लिक करा, आणि जर फक्त कुटुंबातील दोनच महिला योजनेचा लाभ घेत आहे तर “होय” पर्याय निवडा. त्यानंतर टर्म्स बॉक्स वर क्लीक करा आणि “सबमिट करा” बटणवर क्लिक करा.

या नंतर महिलेची ई-केवायसी प्रक्रिया होऊन जाईल, आणि नवीन पेज उघडेल, इथे “तुमची ई-केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे” असं लिहून येईल. म्हणजे mukhyamantri majhi ladki bahin yojana ekyc पूर्ण झाली आहे.

लाडकी बहिण योजना केवायसी स्टेटस कसे चेक करायचे
Ladki bahin yojana ekyc online process केल्यानंतर महिलांना केवायसीची स्थिती जाणून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून केवायसी झाली नसेल तर महिला पुन्हा केवायसी प्रक्रिया करू शकतील.
- सगळ्यात आधी योजनेची अधिकृत वेबसाईट ओपन करा.
- त्यानंतर होमपेज वर दिलेल्या ई-केवायसीच्या लिंकवर क्लिक करा.
- आता तुमच्यासमोर नवीन पेज उघडेल, इथे लाभार्थीचा आधार कार्ड क्रमांक प्रविष्ट करा.
- त्यानंतर “मी सहमत आहे” या पर्यायावर क्लिक करून “ओटीपी पाठवा” बटणवर क्लिक करा.
- आता आपल्या समोर नवीन पेज उघडेल, इथे “या आधार क्रमांकाची e-KYC प्रक्रिया पूर्ण झालेली आहे” असं लिहलेलं राहील.
- जर तुम्हालासुद्धा असेच लिहून येत असेल तर तुमची केवायसी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे.